सरकारने केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी २०२५ मधील सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्येव दोन प्रकारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. यामधील काही सुट्ट्या अनिवार्य आहेत तर काही सुट्ट्या प्रतिबंधित आहेत. अनिवार्य सुट्ट्या या प्रत्येक कर्मचाऱ्याला घ्याव्याच लातात. यामध्ये राष्ट्रीय दिवस, सणांचा समावेश असतो.
२०२५ मध्ये १७ अनिवार्य सुट्ट्या आहेत आणि ३४ प्रतिबंधित सुट्ट्या आहेत.या प्रतिबंधित (पर्यायी) सुट्ट्या कर्मचारी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. ही यादी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मान्यताप्राप्त आहेत. जेणेकरुन प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांबाबत अगोदरच माहिती मिळू शकेल.
२०२५ मधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची यादी
२०२५ मध्ये १७ अनिवार्य तर ३४ पर्यायी सुट्ट्या आहेत. देशातील प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये सुट्ट्यांचे हेच कॅलेंडर लागू होते.
अनिवार्य सुट्ट्यांची यादी
प्रजासत्ताक दिन
महात्मा गांधी जयंती
होळी
बुद्ध पोर्णिमा
ख्रिसमस
दसरा
दिपावली
गुड फ्रायडे
गुरु नानक जयंती
ईद-उल-फित्र
बकरी ईद
महावरी जयंती
मोहरम
ईद-ए-मिलाद
पर्यायी सुट्ट्या
याचसोबत प्रत्येक कर्मचाऱ्याला १२ ऐच्छिक सुट्ट्या मिळतात. त्यातील ३ सुट्ट्या घेण्याची त्यांना परवानगी मिळते
नवीन वर्षाची सुरुवात
होळी
जन्माष्टमी (वैष्णव)
मकरसंक्राती
राम नवमी
महाशिवरात्री
गणेश चतुर्थी
रामनवमी
भाऊबीज
छठ पूजा
रथ यात्रा
ओणम
पोंगल
वसंत पंचमी
गुढी पाडवा
वैशाखी
करवा चौथ
कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक धार्मिक आणि सांस्कृतिक किंवा कुटुंबाच्या उत्सवांनुसार पर्यायी सुट्ट्या निवडू शकतात. यामध्ये सरकारी कर्मचारी सण आणि विशेष प्रसंगी सुट्ट्या घेऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.