

बँकेच्या एफडीमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट (TD) योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. विशेष म्हणजे, या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासोबतच ठराविक व्याजही मिळतं. ज्यांना शेअर बाजारातली जोखीम नकोय आणि निश्चित परतावा हवा आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. मग पोस्ट ऑफिसच्या या योजनेत १ लाख रुपये गुंतवल्यास ५ वर्षात किती पैसे मिळतील? हे जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही १, २, ३ किंवा ५ वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
समजा, तुम्ही या योजनेत एकरकमी १ लाख रुपये गुंतवले, तर १ वर्षांच्या ठेवीवर ६.९ टक्के व्याजदराने अंदाजे ७,०८१ रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मुदत संपल्यानंतर एकूण १ लाख ७ हजार ८१ रुपये मिळतील. दोन वर्षांसाठी ७ टक्के व्याजदराने १४,८८८ रुपये व्याज मिळेल. तीन वर्षांसाठी ७.१ टक्के दराने सुमारे २३,५०८ रुपये व्याज मिळू शकते. पण, पाच वर्षांच्या गुंतवणुकीत सर्वाधिक ७.५ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. त्यामुळे १ लाख रुपये गुंतवल्यावर पाच वर्षांनंतर अ १ लाख ४४ हजार ९९५ रुपये मिळू शकतात. म्हणजेच जवळपास ४४ हजार ९९५ रुपयांचा परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिस TD योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना ठरावीक नियमांनुसार मुदत वाढवण्याची सुविधाही मिळते. एक वर्षांच्या ठेवीसाठी मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत, दोन वर्षांच्या ठेवीसाठी १२ महिन्यांच्या आत, तर तीन आणि पाच वर्षांच्या ठेवींसाठी १८ महिन्यांच्या आत अर्ज करता येतो. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर करसवलतीचा लाभ मिळू शकतो. पात्र गुंतवणुकीवर दीड लाख रुपयांपर्यंत कपातीचा लाभ मिळतो. मात्र, योजनेतून मिळणारे व्याज करपात्र असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.