PMAY: पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार? सरकारने दिली मोठी अपडेट

PMAY Fund: सरकारने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन निधी वितरणास मंजुरी दिलीय. ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत आहेत, त्यांना लवकरच पैसे मिळतील.
PMAY Fund
PMAY Fund
Published On
Summary
  • पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी.

  • प्रलंबित घरकुल हप्त्यांचा निधी लवकरच खात्यात जमा होणार.

  • शासनाने नवीन निधी वितरणाला मंजुरी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते प्रलंबित होती, त्यामुळे घराची बांधकामे रखडली होती, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे. शासनाने नवीन निधी वितरणाला मंजुरी दिली असल्याने थकीत हप्त्यांचा निधी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PMAY Fund
8th Pay Commission Update: कर्मचाऱ्यांना एरियर कधीपर्यंत मिळणार? नवीन वेतन आयोग कधी लागू होणार? नवी अपडेट आली समोर

काय आहे पीएम आवास योजना

पीएम आवास ही योजना ग्रामीण आणि शहरी भागामधील गरजू कुटुंबांसाठी राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. साधारणपणे १ लाख २० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. गरीब आणि बेघर कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

PMAY Fund
Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

केंद्र आणि राज्य सरकारकडून १० हजार कोटींचा निधी

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी ६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर राज्य सरकारकडून ४ हजार कोटी रुपयांचा हिस्सा देण्यात येणार आहे. यामुळे एकूण १० हजार कोटी रुपयांचा निधी घरकुल योजनेसाठी मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com