

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केली जाते आर्थिक मदत
नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळतो फायदा
केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे ही योजना सुरु केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते.
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना (PM Yashasvi Scholarship Yojana)
पीएम यशस्वी योजना ही ओबीसी, ईबीसी, डीएनटी समुदायातील गरीब विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आली आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये. जे विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप हुशार आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेतील स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांची फी, पुस्तकांचा खर्चा कव्हर होतो.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (PM Yashasvi Scholarship Yojana Eligibility)
पीएम यशस्वी योजनेचा लाभ ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी समुदायाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच विद्यार्थी ९ ते ११वीमध्ये चांगले गुण मिळवत असतील तर त्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
किती पैसे मिळतात? (PM Yashasvi Sholarship Money)
पीएम यशस्वी स्कॉलरशिपचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. या योजनेत नववीच्या विद्यार्थ्यांना ७५००० आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना १.२५ लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला NTA च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यानंतर तुम्हाला माहिती टाकून अकाउंट तयार करायचे आहे. यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केल जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.