PM Ujjawala Yojana: फक्त ५५० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर; पीएम उज्ज्वला योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

PM Ujjawala Yojana: केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील नागरिकांना फक्त ५५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 PM Ujjawala Yojana
PM Ujjawala YojanaSaam Tv
Published On

सध्या घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमती ९०० पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना एवढा महागसा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही.याच नागरिकांसाठी केंद्र सरकारने पीएम उज्जवला योजना सुरु केली आहे. या योजनेत सरकार गरीब कुटुंबातील नागरिकांना ५५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देते. या योजनेत सरकार १४.२ किलोच्या तीन सिलिंडरसाठी सब्सिडी देते. सरकार एकूण १६०० रुपये थेट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते.

 PM Ujjawala Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹२१०० मिळणार की नाही, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांने स्पष्टच सांगितले

ग्रामीण भागातील अनेक लोक आजही चुलीवर जेवण बनवतात. यापासून सुटका होण्यासाठी गॅस सिलिंडर कमी किंमतीत दिले जात आहे.

उज्जवला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लाँच करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना गॅस सिलिंडरवर सब्सिडी मिळते.केंद्र सरकारने २०१६ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातील कुटुंबियांना एलपीजी गॅस दिले जातात.

पीएम उज्जवला योजनेसाठी पात्रता

महिला ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

महिलांचे वय १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांनी पीएम आवास योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएम उज्जवला योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, केवायसी, बँक अकाउंट नंबर,बीपीएल प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 PM Ujjawala Yojana
Government Scheme: बोअरवेलसाठी सरकारकडून मदतीचा हात! शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला https://pmuy.gov.in/hi/ujjwala2.html या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर अप्लाय फॉर उज्वला कनेक्शनवर क्लिक करायचे आगे.

यानंतर तुम्ही गॅस एजन्सीचे नाव निवडायचे आहे. यानंतर Indane, Bharat Gas किंवा HP Gas पैकी ऑप्शन निवडायचा आहे.यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.

यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे. येथे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

 PM Ujjawala Yojana
Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com