PM Mudra Loan: तरुणांनो बिनधास्त व्यवसाय सुरु करा, सरकार देतंय 10 लाखांपर्यंतचे कर्ज; कसा घेता येईल लाभ?

PM Mudra Loan To Start Business: तरुणांना स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी सरकारकडून कोणत्याही हमीशिवाय लोन दिले जातात. पीएम मुद्रा योजनेत तुम्हाला १० लाखांपर्यंतचे लोन मिळते.
PM Mudra Loan
PM Mudra LoanGoogle
Published On

देशातील अनेक तरुणांना आपला स्वतः चा बिझनेस सुरु करायचा असतो. परंतु अनेकदा पुरेसे भांडवल नसल्याने व्यवसाय सुरु करता येत नाही. मात्र, तुम्हाला बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते. ज्या तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय त्यांना १० लाखांपर्यंत लोन देते. या योजनेत देशातील कोणताही नागरिक अर्ज करु शकतो.

पीएम मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ साली सुरु करण्यात आली होती. ज्या लोकांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी या योजनेत अर्ज करावा.

PM Mudra Loan
Schemes For Women: लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी... महिलांसाठी सरकारच्या या योजनेत मिळणार लाखो रुपये

पीएम मुद्रा योजनेत तीन कॅटेगरीमध्ये लोन दिले जाते. पहिली म्हणजे शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन. शिशु लोनअंतर्गत तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यंत लोन मिळते. या योजनेत लाभ घेण्यासाठी कोणत्याही हमीची गरज नाही. किशोर लोनमध्ये तुम्ही ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन घेऊ शकतात. तरुण लोनअंतर्गत तुम्ही ५ लाख ते २० लाख रुपयांचे लोन घेऊन बिझनेस सुरु करु शकतात.

पीएम मुद्रा योजनेवर व्याजदर (PM Mudra Loan Interest)

जर तुम्ही पीएम शिशु मुद्रा योजनेअंतर्गत लोनसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला कोणत्याही गँरंटीची गरज नाही. या योजनेत अर्ज करण्यासाठीही कोणतेही शुल्क घेतले जात नाही. या योजनेत तुम्हाला ९ ते १२ टक्के व्याज द्यावे लागेल. या योजनेत लहान दुकानदार, फुल, फूड प्रोसेसिंग यूनिट अशा लहान उद्योजकांना लोन मिळते.

PM Mudra Loan
SBI Scheme: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ४०० दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी वाढवला

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील कोणताही नागरिक अर्ज करु शकतात.अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची बँक डिफॉल्ट हिस्ट्री नसावी. तसेच त्याचे बँकेत अकाउंट असायला हवे. या योजनेत तुम्ही https://www.mudra.org.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

PM Mudra Loan
New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com