
जीएसटी परिषदेने ५% व १८% असे फक्त दोनच स्लॅब ठेवले; १२% व २८% रद्द.
जीवन व आरोग्य विम्यावर जीएसटी पूर्णपणे रद्द; ग्राहकांना दिलासा.
शाम्पू, टूथपेस्ट, पनीर यांसारख्या वस्तूंवर केवळ ५% कर लागू.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व सुटे भागांवर कमी जीएसटीचा थेट फायदा.
GST reform India : जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये बुधवारी रात्री मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राज्यांशी सहमतीतून, ५ टक्के आणि १८ टक्के अशे फक्त दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच १२ आणि २८ टक्के हे कर रद्द करण्यात आले आहेत. जीएसटी आल्यापासून ही आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील तेल, शाम्पू, टूथपेस्टसह अनेक वस्तू आता फक्त ५ टक्के स्लॅबमध्ये येमार आहेत. आरोग्य विम्यावर आता कोणताही जीएसटी राहणार नसल्याचेही ठरवण्यात आलेय.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. दिवळी गिफ्ट म्हणत यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. निर्माला सितारामन म्हणाल्या की, दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आता फक्त पाच टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे शाम्पू, सोप, टूथपेस्ट, सेव्हिंग क्रीम, पनीरसह अनेक वस्तू स्वस्त होणार आहे. १२ टक्क्यांमधील काही वस्तू या ५ टक्क्यांमध्ये आणण्यात आल्या आहेत. वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी आता पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. जीएसटीमध्ये बदल केल्याचा फायदा आता शेतकऱ्यांनाही होणार आहे. ट्रॅक्टरचे टायर, सुटे भाग आणि ट्रॅक्टरवर आता फक्त ५% कर आकारला जातो.
जीएसटीच्या दरांमध्ये बदल कधीपासून लागू होणार आहेत? When will the changes in GST rates come into force?
सिगारेट, तंबाखू उत्पादने, अनिर्मित तंबाखू, बिडी वगळता सेवा आणि वस्तूंवरील जीएसटी दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.
नवीन दर लागू झाल्यानंतर ई-वे बिले रद्द करावी लागतील? वाहतुकीत असलेल्या वस्तूंवर नव्याने बिले जनरेट करावी लागतील का? Will e-way bills have to be cancelled and generated afresh on goods in transit when new rates take effect?
नाही, सध्या व्यवहारात असलेली ई-वे बिले त्यांच्या मूळ वैधता कालावधीनुसारच वैध राहणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
नॉन अल्कोहोलिक पेयेवर ४० टक्के जीएसटी का लावण्यात आलाय? What is the reason for the 40% rate on 'other non-alcoholic beverages'?
चुकीचे वर्गीकरण आणि वाद टाळण्यासाठी समान वस्तूंना समान दरात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेमध्ये यावर चर्चा झाली.
भारतीय ब्रेडच्या विशिष्ट प्रकारांवरच जीएसटी दरात बदल का करण्यात आलाय? What is the reason for revising the GST rate only on specified varieties of Indian bread?
ब्रेड आधीच करमुक्त होता. तर पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा, पोरोट्टा यांवर वेगवेगळा जीएसटी कर लागू होता. आता सर्व भारतीय ब्रेड करमुक्त करण्यात आले आहेत.
फळांचे पेय अथवा फळांच्या ज्यूससह कार्बोनेटेड पेयांवरील जीएसटी का वाढवला? Why has rate of carbonated beverages of fruit drink or carbonated beverages with fruit juice increased?
या वस्तूंवर जीएसटी व्यतिरिक्त भरपाई उपकर लागू होता. आता भरपाई उपकर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने, कराची पूर्वीची पातळी कायम ठेवण्यासाठी करात वाढ करण्यात आली आहे.
पनीर आणि इतर चीज यांच्यातील कर उपचार का वेगळे आहेत? Why is there a different tax treatment between paneer and other cheese?
प्री-पॅकेज्ड आणि लेबल न केलेल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या पनीरवर आधीपासूनच शून्य जीएसटी होता. बदल फक्त प्री-पॅकेज्ड आणि लेबल केलेल्या स्वरूपात पुरवल्या जाणाऱ्या पनीरसाठी करण्यात आले.
IPL सारख्या क्रीडा स्पर्धांव्यतिरिक्त इतर क्रीडा स्पर्धांसाठी प्रवेश सेवांवरील जीएसटी कसा असेल? What will be rate of GST on services of admission to sporting events other than sporting events like IPL?
तिकिटाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त नाही, तिथे प्रवेश सेवा करमुक्त असेल. जर तिकिटाची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर 18% च्या जीएसटी आकारला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.