

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना (PM Kisan Samman Nidhi) राबवत आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. सध्या शेतकरी २४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जून २३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. दोन हप्त्यांमध्ये साधारण चार महिन्याचं अंतर असतं. त्यामुळे २४ वा हप्ता ऑक्टोबर २०२६ मध्ये जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळीसारखे सण असल्याने या दिवसांत हप्ता मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. मात्र केंद्र सरकारकडून २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अनधिकृत तारखेवर विश्वास ठेवू नये.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ६ हजार रुपये, प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
दरम्यान, पुढचा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आणि आवश्यक प्रोसेस पूर्ण ठेवणे महत्त्वाचं आहे. ई-केवायसी पूर्ण नसल्यास किंवा बँक खातं आधारशी लिंक नसल्यास हप्ता अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएफ किसान पोर्टलवर जाऊन आपला लाभार्थी स्टेटस तपासावा.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याशी संबंधित माहिती व्यवस्थित आहे की नाही, हे वेळेत तपासून घेतलं पाहिजे. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच २४व्या हप्त्याबाबत निश्चित माहिती स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.