PM Kisan Yojana: 6 ऐवजी 8 हजार रुपये होणार पीएम किसान योजनेचा हप्ता, केंद्रीय अर्थसंकल्पात होणार घोषणा?

Shetkri Yojana/Scheme: PM Kisan Mandhan Yojana Details in Marathi | केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. पीएम किसान योजनेच्या हप्त्यात केंद्र सरकार वाढ करू शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
6 ऐवजी 8 हजार रुपये होणार पीएम किसान योजनेचा हप्ता, केंद्रीय अर्थसंकल्पात होणार घोषणा?
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जातात. यातच आता अशी बातमी समोर येत आहे की, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या हप्त्याची रक्कम वाढू शकते. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. यादरम्यान यावेळी त्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकतात. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची घोषणा देखील करू शकतात.

6 ऐवजी 8 हजार रुपये होणार पीएम किसान योजनेचा हप्ता, केंद्रीय अर्थसंकल्पात होणार घोषणा?
LIC Scheme: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6,000 रुपये वार्षिक हप्त्यात वाढ करून ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. याबाबतचा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना दिल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने हप्ता वाढणार की नाही हे जाणून घेण्यासाठी अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

  • pmkisan.gov.in ला भेट द्या.

  • Farmers Corner वर नेव्हिगेट करा.

  • "New Farmer Registration" निवडा.

  • ग्रामीण किंवा शहरी शेतकरी नोंदणी निवडा.

  • आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, राज्य प्रविष्ट करा आणि 'Get OTP' वर क्लिक करा.

  • ओटीपी प्रविष्ट करा, आधार प्रमाणीकरण पूर्ण करा आणि आधारनुसार जमीन आणि बँक तपशील प्रविष्ट करा.

6 ऐवजी 8 हजार रुपये होणार पीएम किसान योजनेचा हप्ता, केंद्रीय अर्थसंकल्पात होणार घोषणा?
Success Story : २० वर्षे बँकेत नोकरी, ५० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय; देशातील सर्वात श्रीमंत महिला CEO बद्दल जाणून घ्या!

ऑनलाइन लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी

  • अधिकृत पीएम किसान वेबसाइटला भेट द्या.

  • लाभार्थी स्थिती पेजवर प्रवेश करा.

  • आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करा.

  • स्थिती आणि देयक तपशील पाहण्यासाठी 'Get Data' वर क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com