

सरकार सर्वसामान्यांना किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून विविधं योजना राबवत असतं. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा लागतो. पीएम किसान सन्मान निधी, पेन्शन आणि इतर योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण आता सरकारी योजनांसाठी आधार कार्डपेक्षा मतदार ओळखपत्र म्हणजेच Voter ID आणि बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याची चर्चा सुरू झालीये. केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या एका विधानामुळे या विषयाची चर्चा रंगली आहे.
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी पीपल्स प्लॅन कॅम्पेनच्या कार्यशाळेत बोलताना सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी फक्त आधार कार्डावर अवलंबून राहू नका, असं मत मांडलं. त्याऐवजी बायोमेट्रिक माहिती आणि मतदार ओळखपत्रावरच्या EPIC क्रमांकाचा वापर करण्याबद्दल ते बोलले. पण याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या पीएम किसान किंवा पेन्शनसाठी आधार कार्डाऐवजी Voter ID अनिवार्य झालं, असं समजू नये.
भविष्यात असा निर्णय घेतल्यावर पीएम किसान, पेन्शन आणि इतर सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मतदार ओळखपत्राची आवश्यका भासू शकते. त्यामुळे ज्यांच्याकडे Voter ID नाही किंवा मतदार यादीत नाव नाही, त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे घरबसल्या ऑनलाइन तपासता येतं.
१. सर्वप्रथम https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. 'Search Your Name in Voter List' या पर्यायावर क्लिक करा.
३. त्यानंतर EPIC नंबर किंवा मोबाईल क्रमांकाच्या मदतीने माहिती शोधा.
४. EPIC नंबर टाकून राज्य निवडा आणि कॅप्चा भरा.
५. Search वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मतदार नोंदणीची माहिती दिसेल.
मतदार यादीत नाव नसेल तर काय करावे?
मतदार यादीत नाव आढळले नाही तर जवळच्या BLO म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसरशी संपर्क साधा. तसेच https://voters.eci.gov.in/ या पोर्टलवरूनही तक्रार किंवा आवश्यक अर्ज करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.