

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
या चुकांमुळे मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता
पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम लगेच करा
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी २३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, २३वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे करणे गरजेचे आहे. दरम्यान, काही चुकांमुळे पीएम किसानचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही.
पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य माहिती आणि कागदपत्रे द्यायची आहेत. याचसोबत केवायसी करतानाही काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही हे काम केले तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे.
या कारणांमुळे पैसे मिळणार नाही (These Farmer Will Not Get PM Kisan Yojana Installment)
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केली नाही तर तुम्हाला २३वा हप्ता मिळणार नाही. केवायसीमुळे लाभार्थ्यांची ओळख पटते त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.
आधार आणि बँक खात्याची चुकीची माहिती
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.याचसोबत आयएफएससी कोड बरोबर टाकावा. जर तुमचे बँक खाते बंद असेल तर तुम्हाला पैसे मिळत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच बँकेचा स्टेट्स चेक करावा.
या पद्धतीने चेक करा स्टेट्स (PM Kisan Yojana Status Check)
पीएम किसान योजनेत तुम्हाला पैसे मिळणार की नाही याचा स्टेट्स ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाका. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्स दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.