

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची तारीख जाहीर
१९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना मिळणार २००० रुपये
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारत होते. दरम्यान, आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत घोषणा झालेली आहे.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये (PM Kisan Yojana 21st Installment Date Announced)
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना १९ नोव्हेंबर रोजी २१वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या एक्स अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा (PM Kisan Yojana KYC)
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आधी केवायसी करावी लागणार आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. आता फक्त ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांनी ऑनलाइन पद्धतीने करावी.
स्टेट्स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status)
पीएम किसान योजनेत तुम्हाला पैसे मिळणार की नाही याचा तुम्ही स्टेट्स चेक करु शकतात.
सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर किसान कॉनर यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला लाभार्थी सूची अशी लिंक दिसेल.
तिथे तुम्हाला राज्य, जिल्हा, गाव अशी माहिती टाकायची आहे.
यानंतर माहिती सबमिट केल्यावर तुम्हाला स्टेट्स दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.