PM Kisan Yojana: लाडक्या बहीण योजनेचा हप्ता २९ सप्टेंबर रोजी, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीखही ठरली, वाचा सविस्तर

PM Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा हप्ता किती तारखेला मिळणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा हप्ता २९ सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे.त्यामुळे राज्यातील महिला खूप आनंदाच आहे. त्याचसोबत आता पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांनी २००० रुपये मिळतात.दर वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला दिले जातात. अप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात.(PM Kisan Sanman Nidhi Yojana)

PM Kisan Yojana
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली . या योजनेअंतर्गत पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात. या योजनेअंतर्गत पैसे मिळाले की नाही याचा स्टेट्‍स चेक कसा करायचा याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

अर्जदार आपला स्टेट्‍स कसा चेक करणार?

सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर Know Your Status वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमचा नंबर, कॅप्चा कोड टाकून Get Data वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसेल. (PM Kisan Sanman Nidhi Yojana 18th Installment)

PM Kisan Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? 'हे' काम लगेच करा

लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही? कसं चेक कराल.

सर्वप्रथम तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

त्यानंतर Benificiary List या टॅबवर क्लिक करा.

त्यानंतर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, तालुका, गाव याबाबत माहिती भरावी. त्यानंतर Get Report वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर लाभार्थ्यांची यादी दिसेल. याचसोबत अधिक माहितीसाठी १५५२६१ किंवा २४३००६०६ या मोबाईल नंबरवर कॉल करु शकतात.

PM Kisan Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपया मिळाला नाही?, तिसरा हफ्ताच्या लाभ मिळणार की नाही? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com