PM Kisan Yojana : पीएम किसानचा २४ वा हप्ता उद्या खात्यात जमा होणार, तुम्हाला मिळणार की नाही? घरबसल्या असं तपासा

PM Kisan Yojana 24th Installment Update News : पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी मोबाईलवर स्टेटस, ई-केवायसी आणि पात्रता कशी तपासावी, जाणून घ्या.
Pm Kisan Yojana News
Pm Kisan Yojana News AI Image
Published On: 
Summary
  • पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी होणार

  • या हप्त्यासाठी ९.३४ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ घेता येणार

  • पात्र शेतकरी कुटुंबांना २,००० रुपयांचा हप्ता मिळणार

प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी पैसे येणार आहेत. मात्र तत्पूर्वी या हप्त्याचा लाभ कोणत्या आपल्याला मिळणार की नाही? किंवा आपल्याला अपात्र तर ठरवलं जाणार नाही ना? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. परंतु पुढील काही स्टेप्स फॉलो करून शेतकरी आता घरबसल्या मोबाईलवर योजनेचा हप्ता आला की नाही, तसेच कोणती कागदपत्रे राहिलीत हे तपासू शकतात.

२४ व्या हप्त्यासाठी किती निधी मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जारी करणार आहेत. या अंतर्गत देशातील ९.३४ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना १८,६८० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला जाणार आहे. मात्र निधी जमा झाला की नाही हे समजण्यासाठी स्टेट्स फोनवर चेक करा.

Pm Kisan Yojana News
Weather Update : 'अर्णब' चक्रीवादळाचा हाहाकार! महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

असे तपासा स्टेटस

१. सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

२. वेबसाइटवरील ‘Know Your Status’ हा पर्याय निवडा.

३. तुमचा नोंदणी क्रमांक टाका.

४. त्यानंतर मागितलेली माहिती भरून ओटीपीद्वारे टाका आणि पडताळणी पूर्ण करा.

५. स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टेटसमधून तुमच्या हप्त्याची रक्कम तपासा.

Pm Kisan Yojana News
Ration Card : पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांचे मोफत धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

स्टेटसमध्ये 'हे' दिसत असल्यास सावधान!

तुमच्या स्टेटसमध्ये ‘Withheld’ असे दिसत असल्यास तुमचा हप्ता थांबवला गेला असण्याची शक्यता आहे. तसेच ‘Under Verification’ किंवा ‘Eligibility Under Review’ असा उल्लेख असल्यास तुमच्या पात्रतेची किंवा कागदपत्रांची पडताळणी सुरू असू शकते. अशा वेळी अधिकृत पोर्टलवरील माहिती तपासून आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.

Pm Kisan Yojana News
Headache : थंडीत अर्ध डोकं दुखतं? असू शकतो 'या' गंभीर आजाराचा संकेत!

कोणाला मिळू शकतो योजनेचा लाभ?

शेती करता येणारी जमीन असलेले आणि योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसणारे शेतकरी कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, संस्थात्मक जमीनधारक तसेच नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या काही व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे आणि इतर काही श्रेणींतील व्यक्तींना लागू असलेल्या नियमांनुसार अपात्र ठरवले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com