PM Awas Yojana: PM आवास योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार? समोर आली महत्वाची अपडेट

PM Awas Yojana First Installment: पीेएम आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार आहे.
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas YojanaGoogle
Published On

सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. यामध्ये महिलांसाठी, गरीब लोकांसाठी अनेक योजना आहेत. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना घर बांधून देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते. सरकारच्या या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात अनेक घरे बांधली जातात. सरकारच्या या योजनेअंतर्गत नवीन घरे बांधण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. (PM Awas Yojana)

पीएम आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते. यासाठी सरकार हप्त्यांमध्ये पैसे जमा करते. तर या योजनेअंतर्गत पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, २ ऑक्टोबर रोजी पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १० लाख घरांच्या बांधकामासाठी पहिला हप्ता जारी करणार आहे.

घरांच्या बांधकामासाठी हप्त्यांमध्ये हे पेमेंट दिले जाणार आहे. ७ टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहे. जवळपास १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी १.२० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत ३ कोटी लोकांना घरे बांधून देण्याची घोषणा केली होती. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यापैकी दोन कोटी घरे ही ग्रामीण भागात बांधली जाणार आहे. (PM Awas Yojana First Installment)

Pradhan Mantri Awas Yojana
Government Schemes For Girls: मुलींसाठी सरकारच्या खास योजना! शिक्षणापासून ते लग्नापर्यंत मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

केंद्रिय अर्थसंकल्पात पीएम आवास योजनेत १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये पाचा वर्षांमध्ये २.२ लाख कोटी रुपयांच्या केंद्रिय सहाय्याचा समावेश आहे. सर्व नागरिकांचे स्वतः चे हक्काचे घर असावे, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली होती.

Pradhan Mantri Awas Yojana
Free Silai Machine Scheme: खुशखबर! महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र सरकारची खास योजना; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com