राज्यात रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. सध्या वाहन खरेदीच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु वाहन चालवण्यासाठी इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.परंतु पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. देशातील इंधन कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर होत असतात.
इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर झाल्यानंतरच पेट्रोल डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ७५.८८ डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल ७९.७९ डॉलरवर विकले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे दर.
महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर
नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर
पुण्यात पेट्रोलचे दर १०३.७६ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ९०.२९ रुपये आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.८९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.४० रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.०९ रुपये प्रति लिटरवर विकले जाते तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.७४ रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.