Petrol Diesel Prices On 22 July: 'या' शहरांमध्ये घसरले पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा तुमचं शहर यात आहे का?

Petrol Diesel Prices: त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी देखील काही शरहांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या आहेत.
Petrol Diesel Prices On 22 July
Petrol Diesel Prices On 22 JulySaam TV
Published On: 

Petrol Diesel Prices Down: जागतिक बाजारपेठेत दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. शुक्रवारचे दर देखील सकाळीच जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी देखील काही शरहांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या आहेत. तर काही शहरांमध्ये दर वाढल्याचं दिसत आहे. (Latest Petrol Diesel Fresh Prices)

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसतायत. अशात आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंड क्रूड ऑइल १.५७ पैशांनी महागलं असून ८०.८९ डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. तसेच WTI क्रूड ऑइल १.५६ रुपयांनी वाढले असून ७६.८३ डॉलर प्रति बॅरलची किंमत आहे.

Petrol Diesel Prices On 22 July
Business Idea: नोकरी सांभाळून व्यवसाय करायचाय? १ लाखांच्या भांडवलावर ५० हजार रुपये महिना कमवा

कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

नोएडामध्ये पेट्रोल १ पैशांनी स्वस्त झालंय. त्यानुसार पेट्रोल ९६.६४ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. गुरुग्राममध्ये पेट्रोलचे दर १२ पैशांनी घसरले आहेत. येथे १०८.०७ रुपये प्रति लिटरने पेट्रोल विकलं जातंय. तर डिझेल ४० पैशांनी स्वस्त होऊन ९३.७५ रुपये प्रति लिटर आहे. अजमेर येथे पेट्रोल ४५ आणि डिझेल ४० पैशांनी स्वस्त झालंय. पेट्रोल १०८.०७ तर डिझेल ९३.८९ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

कुठे महागलं पेट्रोल-डिझेल

जयपुरमध्ये (Jaipur) पेट्रोल २६ पैशांनी महागलं आहे. मात्र डिझेल २४ पैशांनी स्वस्त झालंय. त्यानुसार पेट्रोल १०८.६७ आणि डिझेल ९३.८९ रुपये प्रति लिटर आहे. पटनामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात फार बदल झालेला नाही. येथे पेट्रोल १०७.२४ आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Prices On 22 July
Home Based business for ladies : घरगुती व्यवसाय करायचा आहे ? जाणून कोणत्या व्यवसायात मिळेल अधिक फायदा

चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरल आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे.

नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com