Petrol Diesel Price: सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Petrol Diesel Price May Decrease: सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती स्वस्त होणार आहेत. इंधनावरील विंडफॉल टॅक्स रद्द केल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार आहेत.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. इंधानवरील विंडफॉल आणि इन्फ्रास्चक्रचर टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार आहेत. (Petrol Diesel Price Fall)

इंधनावरील विंडफॉल टॅक्स कमी झाल्यामुळे आपोआप पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार आहे. विंडफॉल कर टर्बाइन फ्युएलपासून ते पेट्रोल डिझेलवर लावण्यात येते. याला अतिरिक्त उत्पादक शुल्क असेही म्हणतात. हा कर रद्द झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

अर्थ मंत्रालयाने इंधनावरील विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रशिया आणि युक्रेन वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत. परिणामी मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. परंतु आता हा विंडफॉल टॅक्स रद्द केल्यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणार आहेत. (Windfall Tax Abolishes)

Petrol Diesel Price
Success Story: ३ मुलांची आई, लग्नाच्या १८ वर्षानंतर स्पर्धा परीक्षा, तिसऱ्याच प्रयत्नात यश; वाचा प्रेरणादायी प्रवास

विंडफॉल टॅक्स लावल्याने काही परिस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांना चांगला नफा मिळतो. अनेक देशांनी इंधनावर विंडफॉल टॅक्स लावला होता. मात्र, आता कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील आणि निर्यातीवरील विंडफॉलटॅक्स रद्द करण्यात आला आहे.

Petrol Diesel Price
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

पीटीआयच्या माहितीनुसार, सरकारने कच्च्या तेलाच्या किंमतीत घरसण झाल्यानंतर इंधनाच्या निर्यातीवर लावण्यात आलेला टॅक्स रद्द केला आहे. याबाबत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. यात ओएनजीसीसारख्या कंपन्यांनी उत्पादन केलेले कच्चे तेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपन्यांच्या इंधनाच्या निर्यातीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेताल आहे.

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय? (What Is Windfall Tax)

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे दर जास्त असतात. तसेच कंपन्या निर्यातदेखील वाढवतात. त्यामुळे जास्त नफा कमावता येतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बाजारात स्थिरता आणण्यासाठी विंडफॉल प्रॉफिट टॅक्स लावला होता.

Petrol Diesel Price
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com