Pension Calculation: पेन्शनसाठी पात्रता काय? पेन्शन कशी मोजली जाते? नियम काय? जाणून घ्या सविस्तर

Pension Calculation: प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. या पेन्शनसाठी कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील काही पैसे पेन्शन स्वरुपात दिले जातात.
Pension Scheme
PensionSaam Tv
Published On

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातील एक ठरावीक रक्कम पीएफ अकाउंटमध्ये जमा होते. पीएफमधील काही रक्कम तुम्हाला पेन्शन स्वरुपात दिली जाते. पीएफमधील पैसे ही एक गुंतवणूक असते. पीएफमधील रक्कमेवर भरघोस व्याजदरदेखील मिळते. कोट्यवधी कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतवतात. पीएफमधील गुंतवलेल्या रक्कमेवर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर किती पेन्शन मिळते माहितीये का? पेन्शन कॅल्क्युलेट कशी करतात हे तुम्हाला माहितीये का?

EPF 1995 नुसार संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला उत्पन्न मिळवून देण्यासाठी पेन्शन स्कीम आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना दर महिन्याला किमान १००० ते २००० रुपये पेन्शन मिळते.

Pension Scheme
MS Dhoni Pension: एमएस धोनीला BCCI कडून किती पेन्शन मिळते

पेन्शनचे नवीन नियम

पेन्शन स्कीममध्ये २०२५ मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आता पेन्शनधारकांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट जमा करायचे आहे. तुमच्या पेन्शनची अर्धी रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते. तर अर्धी रक्कम पीएफओ ऑफिसमधून काढली जाते.

पेन्शन कशी मोजली जाते? (Calculation of Pension)

पेन्शन ही तुमच्या बेसिक सॅलरी आणि तुम्ही किती वर्षे काम केले यावर अवलंबून असते. तुमची पेन्शन ही सर्व्हिस x पेन्शनसाठी पात्र पगार/ 70 (Pensionable Service x Pesnionable Salary/ 70) अशी मोजली जाते. याचसोबत तुम्ही जर २० वर्षे सर्व्हिस केली असेल तर तुम्हाला गॅरंटीड २००० रुपये पेन्शन मिळते.

Pension Scheme
EPFO च्या नियमांत मोठा बदल! आता ऑनलाइन PF क्लेम करणे सोपे; २-३ दिवसांत खात्यात जमा होतील पैसे

पेन्शनसाठी क्लेम कसा करायचा? (How To Claim For Pension)

पेन्शनसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने क्लेम करु शकतात. ईपीएफओ वेबसाइट किंवा उमंग या अॅपवरुन तुम्ही क्लेम करु शकतात. यासाठी तुम्हाला आधार नंबर, बँकेचे डिटेल्स, फोटो, withdrawal form 10 D सबमिट करायचा आहे.

पेन्शनचे फायदे (Benefits Of Pension)

पेन्शनमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. जर एखाद्या पेन्शनधारकाचे १० वर्षे पेन्शन घेतल्यावर निधन झाले तर त्याच्या नॉमिनीला २० वर्षापर्यंतच पेन्शन मिळते. याचसोबत वैद्यकीय सुविधांचाही फायदा मिळतो.

Pension Scheme
New Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना; पुढच्या महिन्यापासून होणार सुरू, काय मिळतील लाभ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com