Ankush Dhavre
भारतीय संघासाठी खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं.
मात्र खूप कमी असे खेळाडू आहेत, ज्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते.
धोनी त्यापैकीच एक आहे.
एमएस धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
धोनीच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे.
धोनीने २०२० मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती.
भारतीय संघातून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंना, बीसीसीआयकडून पेन्शन दिली जाते.
माध्यमातील वृत्तानुसार, एमएस धोनीला बीसीसीआयकडून ७० हजार रुपये पेन्शन दिली जाते.