Paytm Payment Bankचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; मंडळाचं सदस्यत्वही सोडलं

Paytm Payments Bank : विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. यासोबतच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळ सदस्याचा सुद्धा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाची पुनर्रचना करण्यात आलीय.
(File Pic) Paytm Payment Bank Vijay Shekhar Sharma
(File Pic) Paytm Payment Bank Vijay Shekhar SharmaANI
Published On

Vijay Shekhar Sharma Resignation From Paytm Payment Bank :

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. यासोबतच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळ सदस्याचा सुद्धा राजीनामा दिलाय. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे सर्वात मोठे भागधारक आहेत.(Latest News)

रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank Of India) पेटीएम पेमेंट बँकेवर (Paytm Payment Bank) कारवाई केल्यानंतर पेटीएमच्या संचालक मंडळात अनेक बदल होत आहेत. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अर्धवेळ नॉन-एक्झीक्युटिव्ह अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच त्यांनी PPBL चे बोर्ड सदस्य पदही सोडलं असल्याची माहिती कंपनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान विजय शेखर शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाची पुनर्रचना करण्यात आलीय. आता या नव्या मंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

जर पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी जोडल्या असतील त्या १५ मार्च नंतर सुरू राहणार नाहीत. जर ही सेवा सुरू ठेवायची असेल तर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्यांचे पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागतील. Paytm ची मूळ कंपनी One97 Communication Limited यासाठी 4-5 बँकांशी संपर्कात आहे.

NPCIने मार्गदर्शक सुचना देताना सांगितलं की, पेटीएम ॲपद्वारे सेवा सुरू ठेवण्यासाठी NPCI ने पेमेंट सेवा प्रदाते म्हणून उच्च व्हॉल्यूम UPI व्यवहार हाताळण्याची क्षमता असलेल्या बँकांचे प्रमाणीकरण करण्याची सुविधा प्रदान करावी. RBI ने NPCI या डिजिटल पेमेंटच्या ऑपरेशनवर देखरेख करणाऱ्या संस्थेला @paytm हँडल इतर नवीन बँकांमध्ये स्थलांतरित करण्यास सांगितलंय.

UPI हँडलचे स्थलांतर फक्त त्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी होईल ज्यांचे UPI हँडल पेटीएम पेमेंट बँकेशी जोडलं आहे, असं आरबीआयने सांगितले. युपीआयच्या सेवेसाठी Paytm ने Axis बँकेसोबत काम करणार असल्याचं सांगितलं होतं. अॅक्सिस बँक थर्ड पार्टीने काम करेल असा अर्ज NPCIकडे करण्यात आला होता. पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे UPI व्यवहार होत असल्याने पेटीएमचे सध्या टीपीएपी म्हणून वर्गीकरण केलेले नाही.

तर दुसरीकडे, Amazon Pay, Google Pay, Mobikwik, PhonePe आणि WhatsApp सह 22 संस्थांकडे सध्या TPAP परवाने आहेत. कोणतेही UPI खाते सक्रिय ठेवण्यासाठी ते बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. NCPI देशभरातील UPI व्यवहारांचे संचालन आणि देखरेख करते.

(File Pic) Paytm Payment Bank Vijay Shekhar Sharma
Paytm: पेटीएमला मोठा दिलासा! १५ मार्चनंतर पेटीएम क्यूआर कोड, पेटीएम साउंडबॉक्स राहणार सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com