Pan Card: दर दहा वर्षांनंतर पॅन कार्ड बदलावे लागते? जाणून घ्या नियम

Pan Card Validity:पॅन कार्ड ही भारतीय नागरिकांचे ओळखपत्र आहे. अनेक आर्थिक व्यव्हारांसाठी पॅन कार्ड हे आवश्यक असते. आयकर भरण्यासाठी, घर घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून पॅनकार्डची आवश्यता असते.
Pan Card
Pan CardSaam Tv

पॅन कार्ड ही भारतीय नागरिकांचे ओळखपत्र आहे. अनेक आर्थिक व्यव्हारांसाठी पॅन कार्ड हे आवश्यक असते. आयकर भरण्यासाठी, घर घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून पॅनकार्डची आवश्यता असते. परंतु पॅन कार्डबाबत अनेक प्रश्न असतात. पॅन कार्ड हरवले तर काय करावे लागेल? पॅन कार्डवरील माहिती चुकली असेल तर काय करावे? किंवा पॅन कार्ड दहा वर्षांपेक्षा जुने झाल्यास ते बंद होते का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले असतात. आज आम्ही तुम्हाला याबाबतच माहिती देणार आहोत.

१० वर्षांपेक्षा जुने पॅन कार्ड बदलावे लागते का?

जर तुमचे पॅन कार्ड १० वर्षांपेक्षा जुने असेल तर ते बदलणे आवश्यक नाही. तुम्ही एकदा पॅन कार्ड काढल्यावर ते आयुष्यभर तुमच्यासोबत असते. त्यावरील खाते क्रमांक हा कायमस्वरुपी एकच असतो. हे पॅन कार्ड तुम्ही रद्द किंवा सरेंडर केल्याशिवाय ते बंद होत नाही.

जर तुमचे पॅन कार्ड तुटले असेल किंवा चुकीच्या स्वाक्षरीमुळे पॅन कार्ड बदलणे आवश्यक नाही. तुम्ही पॅन कार्डची ड्युप्लिकेट कॉपी बनवून घेऊ शकता. हे पॅन कार्ड तुम्ही सर्व ठिकाणी वापरु शकतात.

Pan Card
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अन् हेल्थ फीचर्ससह सॅमसंग कंपनी करणार Galaxy Ring लाँच; जाणून घ्या किंमत

पॅन कार्डमध्ये १० अंकी नंबर असतो. त्याचसोबत युजर्सची सही, फोटो, पत्ता पॅन कार्डमध्ये असतो. प्रत्येकाला एक युनिक पॅन कार्ड नंबर दिला जातो. हा पॅन कार्ड नंबर बदलू शकत नाही. तुम्ही पॅन कार्डमधील माहिती बदलू शकता. परंतु पॅन नंबर बदलू शकत नाही.

प्रत्येक व्यक्तीला एकच पॅन कार्ड दिले जातील. हे पॅन कार्ड आयुष्यावर वॅलिड असते. तुमच्याकडे एक पॅन कार्ड असेल तर तुम्ही दुसऱ्या पॅन कार्डसाठी अर्ज करु शकत नाही. असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो.

Pan Card
Samsung: क्या बात, क्या बात! मोबाईल तुटो किंवा फुटो तरी दुरुस्त करुन देणार कंपनी; Samsungची मोठी घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com