OYO in US Market : ओयोचा अमेरिकेत विस्तार, तब्बल ४३०० कोटींची गुंतवणूक; नेमका प्लॅन काय?

OYO Expands US Market with 525 million dollar : ओयोने अमेरिकेत आपला व्यवहार विस्तार केल्याचं दिसतंय. कारण एकाच वेळी ४३०० कोटी रुपये खर्च करत ओयोने युएसमध्ये गुंतवणूक केलीय.
ओयो
OYO Saam Tv
Published On

मुंबई : बजेट हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओयोकडे पाहिले जाते. ओयो अमेरिकेमध्ये व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात दिसतेय. एकाचवेळी ४३०० कोटींची गुंतवणूक ओयोने अमेरिकेत केल्याचं समोर आलंय. ओयोने अमेरिकेत हॉटेल सीरीज मोटेल ६ आणि स्टुडिओ ६ ब्रँड्स ५२५ मिलियन डॉलरमध्ये खरेदी करण्याची घोषणा केलीय.

ओयोने ही खरेदी ब्लॅकस्टोन रिअल इस्टेटमधून केली आहे. हा व्यवहार पूर्णपणे रोख स्वरूपात होणार असल्याची माहिती मिळतेय. भारतीय युनिकॉर्न ओयो अमेरिकेमध्ये विस्ताराकडे लक्ष देत असल्याचं (OYO Expands US Market) दिसतंय. आपण याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

ओयोची युएसमध्ये गुंतवणूक

ओयोची मूळ कंपनी ओरेवल स्टेजने शनिवारी याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं की त्यांनी जी६ हॉस्पिटॅलिटी घेण्यास सहमती दर्शविली आहे. जी६ हॉस्पिटॅलिटी युनायटेड स्टेट्समध्ये बजेटमध्ये लॉज प्रदान (OYO News) करते. हा ब्रँड स्टुडिओ ६ ची मूळ कंपनी आहे. पुढील वर्षी जानेवारी-मार्चपर्यंत हा व्यवहार पूर्ण होणे अपेक्षित आहे. मोटेल ६ चे फ्रेंचायझी नेटवर्क १.७ अब्ज डॉलर कमाई करते. ओयोने २०१९ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश केला होता. स्टार्टअपने अलीकडेच आणखी विस्तार करण्याच्या हेतुने पाऊले उचलली आहेत.

ओयो
तुम्हीही सुरु करु शकता OYO चा बिझनेस! मिळतील दुप्पट रिटर्न्स

३५ राज्यांमध्ये ३२० हून अधिक हॉटेल्स

जपानची सॉफ्टबँक ही ओयोमधील प्रमुख गुंतवणूकदार आहे. मोटेल ६ आणि स्टुडिओ ६ ब्रँड अधिक बळकट करण्यासाठी जागतिक वितरण नेटवर्क आणि विपणन कौशल्याचा लाभ घेईल, असे ओयोने (OYO) म्हटलंय. तसेच या गोष्टींच्या मदतीने कंपनीला आर्थिकदृष्ट्या मजबूत केले जाईल. ओयो २०१९ मध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आला होता. ओयोची मूळ कंपनी Oravel Stays आहे. ओयो एकूण ३५ राज्यांमध्ये ३२० हून अधिक हॉटेल्स चालवते.

ओयोने २०२३ मध्ये त्यांच्या यूएस पोर्टफोलिओमध्ये सुमारे १०० हॉटेल्स जोडली होती. त्यांनी २०२४ मध्ये सुमारे २५० हॉटेल्स जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ओयोचे इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम स्वरूप यांनी (OYO Investment) न्यूज १८ हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, आमच्या सारख्या स्टार्टअप कंपनीसाठी आमची आंतरराष्ट्रीय उपस्थिती मजबूत करण्यासाठी हे संपादन एक महत्त्वाचा टप्पा आहे.

ओयो
OYO हॉटेलला मोठा दणका; ग्राहकाला द्यावी लागली २० हजार रुपयांची नुकसान भरपाई, काय आहे नेमकं प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com