बाजारात लाँच होणार तगडा स्मार्टफोन; पावरफुल प्रोसेसर, 7,300mAh ची बॅटरी आणि बरंच काही

OnePlus 15 Features Triple 50MP Rear Camera: OnePlus 15 उद्या लॉन्च होणार आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, 7,300mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग, ट्रिपल 50MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.
OnePlus 15 with Triple 50MP Rear Camera, 32MP Selfie, Snapdragon 8 Elite Gen 5, and 7300mAh Battery
OnePlus 15 with Triple 50MP Rear Camera, 32MP Selfie, Snapdragon 8 Elite Gen 5, and 7300mAh BatterySaam Tv
Published On

OnePlus 15 उद्या (सोमवार) लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा नवीन आणि सर्वात पॉवरफुल मोबाइल चिपसेट दिला जाईल. याशिवाय, यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा असणार आहे. बॅटरी 7,300mAh असून, 120W फास्ट चार्जर असणार आहे जेणेकरून काही मिनिटांमद्धेच तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता.

OnePlus 15 with Triple 50MP Rear Camera, 32MP Selfie, Snapdragon 8 Elite Gen 5, and 7300mAh Battery
SIP Investment: १० वर्षांत ₹५० लाख कमवण्याचे स्वप्न होईल साकार! दरमहा किती SIP करावी लागेल? जाणून घ्या

OnePlus आता आपला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. याचे नाव OnePlus 15 असेल. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीनतम आणि पॉवरफुल मोबाइल चिपसेटसह लाँच होणार आहे. तसेच मागच्या बाजूने ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. OnePlus 15 उद्या चीनमध्ये लॉन्च होणार आहे, त्यानंतर लवकरच भारतातही उपलब्ध होईल. कंपनीने भारतातील अधिकृत पोर्टलवर याचा टीझर देखील प्रकाशित केला आहे. फोनची जाडी अंदाजे 8.5mm असू शकते.

OnePlus 15 with Triple 50MP Rear Camera, 32MP Selfie, Snapdragon 8 Elite Gen 5, and 7300mAh Battery
दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

OnePlus 15 हा मागील वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus 13 चा अपग्रेडेड मॉडेल आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे कंपनीने OnePlus 14 लॉन्च केलेले नाही. OnePlus 15 मध्ये 7,300mAh बॅटरी आणि मागच्या बाजूने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

OnePlus 15 चे खास डिझाईन

कंपनीने OnePlus 15 चे टीझर जारी केले आहे, ज्यातून फोनच्या डिझाईन आणि काही स्पेसिफिकेशन्स समजले आहेत. फोन दिसण्यात OnePlus 13s सारखा आहे. मागच्या बाजूने Squoval Camera Island दिले असून, OnePlus ची ब्रँडिंगही आहे.

OnePlus 15 with Triple 50MP Rear Camera, 32MP Selfie, Snapdragon 8 Elite Gen 5, and 7300mAh Battery
Jalgaon-Mumbai Flight: आनंदाची बातमी! आता जळगाववरून दीड तासात मुंबई गाठा; जाणून घ्या विमान उड्डाणांचे वेळापत्रक

फीचर्स

IP68 रेटिंग (डस्ट आणि वॉटरप्रूफ)

6.78 इंच LTPO AMOLED डिस्प्ले

165Hz रिफ्रेश रेट

स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Ceramic Guard Glass

प्रोसेसर

OnePlus 15 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 (3nm) प्रोसेसर असेल, ज्यास Adreno 840 GPU सोबत मिळेल. RAM 16GB आणि स्टोरेज 1TB पर्यंत उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा सेटअप

बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (सर्व 50MP लेंस)

ड्युअल LED लाईट्स

32MP सेल्फी कॅमेरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com