निसान ही ऑटोमोबाईल कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीने नुकतीच आपली नवीन Nissan X-Trail कारचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. ही कार आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज आहे. कंपनीची ही कार तीन रंगामध्ये सादर करण्यात आली आहे. पर्ल व्हाइट, शॅम्पेन सिलव्हर आणि डायमंड ब्लॅक या तीन रंगामध्ये कार बाजारात लाँच करण्यात आली आहे.
Nissan X-Trail चे चौथ्या जनरेशनचे मॉडेट हे कंपनीच्या CMF-C प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही कार २०२१ पासून बाजारात आहे. जागतिक बाजारात ही कार SUV-5सीटर आणि 7- सीटर लेआउटसह येते. परंतु भारतात फक्त 7- सीटर व्हेरियंट सादर करण्यात आला होता. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ४९.९२ लाख रुपये आहे.
Nissan X-Trail SUV आकर्षक लूकसह येते. या कारचा लूक एसयूव्ही फुल साइज एसयूव्हीपेक्षा चांगला आहे. या कारमध्ये स्पिलिट हेडलॅम्प, V मोशन ग्रिल देण्यात आले आहे. ज्लास्टिक क्लोडिंगसह व्हील्समुळे कारच्या मागच्या बाजूला स्मार्ट लूक आला आहे. या कारमध्ये डायमंड कट अलॉय व्हील देण्यात आले आहे. तर मागील बाजूस Wraparound LED टेल लॅम्प दिला आहे.
या एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे थ्री सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनला 12V माइल्ड हायब्रिड सिस्टिमशी जोडला गेला आहे. हे इंजिन 163bhp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरे करते. हे इंजिन शिफ्ट-बाय- वायर CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडला गेला आहे.
या कारमध्ये ड्युअल पॅन पॅनोरामिक सनरुफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, ८ इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम, १२.३ इंच ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर देण्यात आला आहे. या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या Nissan X Trail या कारची स्पर्धा Toyota Fortuner, MG Gloster, Skoda Kodiaq या कारशी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.