New Rules: कामाची बातमी! बँक, पेन्शन अन् आधारच्या नियमात बदल; तुम्हाला माहितच असायला हवे

News Rules From Today 1 November 2025 : १ नोव्हेंबर २०२५ म्हणजेच आजपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये यूपीएस स्कीमपासून ते बँकेच्या नियमांचा समावेश आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On
Summary

आज १ नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलले

बँक खाते नॉमिनीपसून ते यूपीएस स्कीममध्ये बदल

प्रत्येकाला हे नियम माहित असायलाच हवे

आजपासून नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. बँकेपासून ते पेन्शनच्या नियमांत बदल केले आहेत. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाचे नवीन नियम आज १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. यामुळे नागरिकांवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे नियम माहित असणे गरजेचे आहे.

Rule Change
Rule Change: आधार कार्ड ते बँक; १ नोव्हेंबरपासून ५ महत्त्वाचे नियम बदलणार; थेट तुमच्यावर होणार परिणाम

१. बँक खात्यात चार नॉमिनी

आता ग्राहकांना बँक खात्यात चार नॉमिनी जोडता येणार आहे. याआधी फक्त एकच नॉमिनी जोडू शकत होता. यात क्रमवार पद्धतीने नॉमिन जोडू शकतात. यामध्ये तुम्हाला बँक लॉकरसाठी क्रमवार सुविधा मिळणार आहे.

२. स्टेट बँक क्रेडिट कार्ड

स्टेट बँकेने क्रेडिट कार्डवरील नियमांमध्ये बदल केले आहे. तुम्ही जर शाळा किंवा कॉलेजची फी थर्ड पार्टी अॅपद्वारे भरली तर तुम्हाला १ टक्के चार्ज द्यावा लागेल. तुम्ही अधिकृत वेबसाइट किंवा पीओएस मशीनद्वारे फी भरली तर कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. याचसोबत काही ठिकाणी जास्त वॉलेट टॉप अपवर १ टक्के शुल्क लागणार आहे.

३. युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS)

केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीममधील अंतिम तारीख वाढवून दिली आहे. यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे. याआधी ही तारीख ३० सप्टेंबर होती.

Rule Change
Rule Change: आधार कार्ड ते बँक; १ नोव्हेंबरपासून ५ महत्त्वाचे नियम बदलणार; थेट तुमच्यावर होणार परिणाम

४. पेन्शनधारकांना जीवन प्रमाण पत्र

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला Jeevan Pramaan Portal किंवा बँक आणि पोस्टात जाऊन हे प्रमाणपत्र सबमिट करावे लागणार आहे.

५. आधार पॅन लिंक

आता आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार पॅन कार्ड लिंक करु शकतात. हे काम खूप महत्त्वाचे आहे.

Rule Change
Post Office SCSS Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २.४६ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com