मोठी बातमी! सिलिंडर बुकिंगच्या नियमात पुन्हा बदल होणार? महत्वाची अपडेट समोर

Gas Cylinder rules update : सिलिंडर बुकिंगच्या नियमात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. नवा बदल १ मे पासून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Gas Cylinder news
Gas Cylinder newssaam tv
Published On
Summary

गॅस सिलिंडरच्या नियमात बदल होण्याची शक्यता

महिन्याला मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या नियमात होणार बदल

भारताने एलपीजी आयातीचे धोरण बदलले

देशातील तीन ऑइल कंपनी इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या नव्या नियमाबाबत चर्चा सुरू झाली आहे. नवा नियम लागू झाल्यास महिन्याला मिळणारा गॅस सिलिंडर डिलिव्हरी करण्याच्या पद्धतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना सिलिंडरच्या नियमाबाबत अलर्ट राहावे लागणार आहे.

मे महिन्यात गॅसच्या किंमती आणि धोरणात बदल होऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून गॅसच्या दरात बदल होऊ शकतो. मे महिन्यापासून सिलिंडर बुकिंगचा अवधी वाढवण्याची शक्यता व्यक्ती केली आहे. नव्या नियमानुसार, १ मे पासून एक सिलिंडरनंतरचा बुकिंगचा कालावधी बदलण्याची शक्यता आहे.

ओटीपी आधारित डिलिव्हरी सिस्टम देखील कायमस्वरुपी केली जाऊ शकते. नव्या महिन्यापासून सिलिंडर डिलिव्हरीसाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल. या नियमानुसार, तुम्ही ओटीपी दिला नाही, तर तुम्हाला सिलिंडर मिळणार नाही.

Gas Cylinder news
LPG Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा

कच्च्या तेलाचा पुरवठा रोखल्यानंतर सरकारी तेल कंपन्या आता अमेरिकेकडून अतिरिक्त एलपीजी खरेदी करत आहे. त्यानंतर या गॅस सिलिंडरची डिलिव्हरी जून-जुलै महिन्यापासून सुरू होईल. भारताला दररोज किमान ८०००० टन एलपीजीची गरज भासते. तर देशात सध्या ४६००० टन प्रतिदिन एलपीजीचे उत्पादन होते. तरीही भारताला आयातीवर अवलंबून राहावं लागतं.

Gas Cylinder news
LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

भारत आधी ९० टक्के एलपीजी आखाती देशातून खरेदी करत होता. परंतु रणनीती बदलल्यानंतर स्वयंपाकाच्या गॅसची आयात इतर देशातून वाढवण्यात आली. भारताने आखाती देशाव्यतिरिक्त अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जारिया आणि रशियाकडून एलपीजी खरेदी सुरू करण्यात आली आहे. भारत आधी १० देशातून एलपीजी आयात करत होता. आता १५ देशातून आयात केली जात आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, जवळपास ८ लाख टन एलपीजी आयात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी १० जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात पोहोचले आहेत. यात ९ जहाज स्वयंपाकाच्या गॅसचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com