New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

EPFO Pension Update: सध्या EPFO चा नवा नियम चर्चेत आहे. यामध्ये पेन्शनसंदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. पुढील माहितीत आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
New Pension Rule
New Pension RuleSaam Tv
Published On: 

प्रत्येक व्यक्ती त्याच्या भविष्यासाठी पगातला काही भाग EPFO मध्ये जमा करत असते. त्याने भविष्यात अडीअडचणींच्या वेळी किंवा ज्या ठिकाणी मोठा खर्च होईल, अशा ठिकाणी ती रक्कम लगेचच वापरता येते. मात्र मागच्या महिन्यापासून EPFOने बेसिक सॅलरीची मर्यादा २५००० रुपये केली. त्यामुळे जास्त कर्मचारी अनिवार्य सामाजिक सुरक्षा कक्षेत घेणं अपेक्षित आहे. पण त्याचा EPS पेन्शनसाठीची पात्र, रिटायर झालेल्याचे योगदान, आणि सदस्यत्वासाठी पात्र न ठरू शकणारे कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतो, हे प्रत्येक कर्मचाऱ्याने जाणून घेतलं पाहिजे.

२५००० रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांसाठी काय बदलले?

EPF अंतर्गत अनिवार्य सदस्यत्वासाठी लागू असलेली वेतन मर्यादा वाढल्यावर, आधी १५,००० रुपयांपेक्षा जास्त वेतनामुळे अनिवार्य EPF कक्षेबाहेर असलेले पात्र कर्मचारीही या व्यवस्थेत येऊ शकतात. याबदलामुळे ५१ लाखांहून जास्त अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पण या बदलाची अंमलबजावणी आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ अधिकृत नियमांनुसार तुम्ही तपासून घेतला पाहिजे.

New Pension Rule
DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

२५००० रुपयांपेक्षा जास्त पगार असल्यास पेन्शन मिळणार नाही?

फक्त पगार २५००० रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणून आधीपासूनचे EPS सदस्यत्व आपोआप संपतं, असं नाही. कर्मचारी याआधी EPS सदस्य होता का, त्याचे योगदान आणि सेवा नोंदी काय आहेत, यावर पात्रता अवलंबून असते. दुसरीकडे, प्रथमच EPF व्यवस्थेत प्रवेश करणाऱ्या आणि लागू वेतन मर्यादेपेक्षा जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना EPS सदस्यत्व आपोआप मिळेलच असं नाही.

New Pension Rule
Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

EPF आणि EPS मधील फरक समजून घ्या

EPF ही रिटायरमेंटसाठी बचत करणारी भविष्य निर्वाह निधी योजना आहे, तर EPS ही पात्र सदस्यांना निवृत्तिवेतन देणारी योजना आहे. सर्वसाधारणपणे कर्मचारी आपल्या बेसिक वेतन आणि महागाई भत्त्याच्या १२ टक्के रक्कम EPF मध्ये जमा करतो. नियोक्त्याच्या योगदानातल्या नियमानुसार ठरलेला भाग EPS कडे आणि उर्वरित भाग EPF खात्यात जमा होतो.

पेन्शनसाठी किती वर्षांची सेवा आवश्यक?

EPS नियमांनुसार, नियमित मासिक पेन्शनसाठी किमान १० वर्षांची पात्र सेवा आवश्यक असते. नियमित पेन्शन साधारणपणे वयाच्या ५८ वर्षांपासून मिळते. काही अटी पूर्ण झाल्यावर वयाच्या ५० वर्षांनंतर कमी दराने पेन्शन घेण्याची तरतूद आहे.

कर्मचाऱ्यांनी काय करावे?

कर्मचाऱ्यांनी आपला UAN, EPF पासबुक, EPS सदस्यत्व आणि सेवा नोंदी तपासाव्यात. गरज असल्यास कंपनीच्या HR विभागाशी किंवा EPFO कार्यालयाशी संपर्क साधावा. पगार मर्यादेतील बदलामुळे सामाजिक सुरक्षा लाभांची व्याप्ती वाढू शकते; मात्र पेन्शनसाठी स्वतंत्र पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com