
रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएमची मुख्य कंपनी One97 Communication कंपनी संकटात सापडली आहे. कंपनीचे शेअरमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. मागील तीन दिवसांत शेअरमध्ये जवळपास ४२ टक्क्यांचा घसरण झाली आहे. अशातच पेटीएम आपला वॉलेट बिझनेस मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला विकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेनंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये मोठी उसळी आल्याचं पाहायला मिळालं. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर आज तब्बल १५.२१ टक्क्यांनी वाढला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीची NBFC आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक One97 Communication कंपनीच्या विक्रीबाबत बोलणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी झाली आहे. (Latest News)
याबाबत द हिंदू बिझनेसने अहवाल दिला आहे. एचडीएफसी बँक आणि जिओ फायनान्शियल पेटीएम वॉलेट बिझनेस विकत घेण्यासाठी तयार आहेत. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांची टीम नोव्हेंबरपासून जिओ फायनान्शियलशी चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने बंदी घातल्यानंचर एचडीएफसी बँकेशी चर्चा सुरु झाली.
पेटीएम पेमेंट्सच्या शेअरमध्ये घसरण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. सोमवारी शेअर बाजारात पेटीएमचा शेअर ४३८.५० रुपयांवर आला आहे. जवळपास ४२.४ टक्क्यांनी पेटीएमच्या शेअरमध्ये घरसण झाली आहे.
पेटीएमवर कारवाईचे कारण काय?
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या १ हजारहून अधिक ग्राहकांना खाती एकाच पॅन कार्डशी जोडली गेली होती. त्यामुळे आरबीआयला अनियमिततेटा संशय आला. त्याबद्दल बँकेला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर पेटीएमने चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर केवायसीमध्येही काही चुका असल्याचे समोर आले. त्यामुळेच आरबीआयने पेटीएम पेमेंट्सवर कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.