FasTag केवायसीची अंतिम मुदत वाढवली; केवायसी अपडेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

FasTag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने फास्टॅगबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Fastag केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ३१ जानेवारी २०२४ ही फास्टॅग केवायसी करण्याची शेवटची तारीख होती.
FASTag KYC
FASTag KYC Saam Tv
Published On

FasTag KYC Update Dealine Increase:

भारतीय राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने फास्टॅगबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Fastag केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ३१ जानेवारी २०२४ ही फास्टॅग केवायसी करण्याची शेवटची तारीख होती. ही मूदत आता वाढवण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने फास्टटॅग केवायसी करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ केली आहे. आता वाहनचालक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत केवायसी करु शकणार आहेत.

फास्टॅगमुळे महामार्गावर टोल गोळा करणे सोपे होते. ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. ज्यामध्ये वाहनावरील कोड स्कॅन होतो आणि टोलचे पैसे अकाउंटमधून घेतले जातात. आता फास्टॅग केवायसी करणे अनिवार्य केले आहे.  (latest News)

फास्टॅग केवायसी ऑनलाइन कसे करायचे?

सर्वप्रथम बँकेशी लिंक असलेल्या फास्टॅग वेबसाइटवर जा.

यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरुन लॉग इन करा आणि OTP भरा.

यानंतर My Profile वर क्लिक करा. त्यानंतर केवायसी टॅबवर क्लिक करा.

यामध्ये आवश्यक माहिती भरा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

फास्टटॅग केवायसीसाठी तुम्हाला वाहनाची आर.सी, आयडी कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साइज फोटो, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असते.

FASTag KYC
EPFO Interest Rate : नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर! PF च्या व्याजदरात वाढ होणार?

फास्टॅग स्टेटस कसे तपासायचे?

फास्टॅग स्टेट्स तपासण्यासाठी सर्वप्रथम fasttag.ihmcl.com ला भेट द्या.

त्यानंतर लॉग इन बटणवर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोन नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाका.

त्यानंतर My Profile विभागात क्लिक करा. त्यानंतर केवायसी स्टेट्स क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या केवायसीचा स्टेट्स दिसेल.

ऑफलाइन पद्धतीने केवायसी कसे करायचे?

सर्वप्रथम ज्या बँकेने तुमचा फास्टॅग जारी केला आहे. त्या बँकेच्या शाखेत जा. त्यानंतर बँकेत तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो सबमिट करा. त्याचसोबत काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. यानंतर बँक केवायसीसंबंधित कागदपत्रांची पडताळणी करेन. त्यानंतक तुमचा केवायसी अपडेट करेन.

FASTag KYC
KYC Update: बँकेत केवायसी करण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक, RBI ने नागरिकांना सांगितले सावधगिरीचे उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com