Aadhaar Card: हरवलेलं आधार कार्ड तुम्हाला पोहोचवेल जेलमध्ये? अशा पद्धतीने 'लॉक' करा तुमचं कार्ड

Aadhaar Card Fraud News: आपलं आधार कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर अनेक समस्या निर्माण होतात. अनेक व्यक्ती याचा गैरफायदा देखील घेऊ शकतात. त्यामुळं आधार कार्ड लॉक करणं फायदेशीर ठरतं. आधार कार्ड लॉक कसं करायचं ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
Aadhaar Card
Aadhaar CardSaam Tv
Published On

How To Lock Aadhar Card

आधार कार्ड (Aadhar Card) हे भारतातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. हे दस्तऐवज अनेक ठिकाणी पडताळणीसाठी वापरलं जातं. जर तुमचं आधार कार्ड हरवलं तर ते चुकीच्या हातात जाऊ शकते. त्याचा वापर फसवणुकीसाठीही होऊ शकतो.  (latest news)

आधार बायोमेट्रिक डेटाचा गैरवापर फसवे आर्थिक व्यवहार करण्यासाठी, मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे ओळख चोरी करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आधार कार्डचा (Aadhar Card) गैरवापर टाळणं गरजेचं आहे. यासाठी आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) प्रदान केली आहे. तुमचे आधार कार्ड लॉक होताच. हे प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी वापरल जाऊ शकत नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आधार लॉक आणि अनलॉक म्हणजे काय

आधार कार्ड लॉक (Aadhar Card Lock) करून, नागरिक घोटाळेबाजांना बायोमेट्रिक्स, UID, UID टोकन आणि OTP साठी VID सारख्या कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड वापरण्यापासून रोखू शकतात.

जर तुम्हाला आधार कार्ड मिळाले किंवा तुम्हाला नवीन आधार कार्ड मिळाले. त्यामुळं तुम्ही UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अॅपद्वारे तुमचा UID अनलॉक करू शकता. UID अनलॉक केल्यानंतर तुम्ही UID, UID टोकन आणि VID वापरून प्रमाणीकरण पुन्हा सुरू करू शकाल.

Aadhaar Card
#shorts aadhar update deadnline news | आधार अपडेटवर मोठी बातमी

आधार कार्ड ऑनलाइन लॉक करण्याच्या पायऱ्या

सर्व प्रथम UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. यानंतर My Aadhaar वरील टॅबवर क्लिक करा. यानंतर, आधार सेवा विभागात जा आणि 'आधार लॉक/अनलॉक' वर क्लिक करा. त्यानंतर 'लॉक यूआयडी' पर्याय ((Aadhar Card) निवडा. आता तुमचा आधार क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड टाका. त्यानंतर 'ओटीपी पाठवा' बटणावर क्लिक करा. यानंतर, प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा. या प्रक्रियेद्वारे आधार कार्डही अनलॉक करता येते.

Aadhaar Card
#Shorts : आता Aadhar Card सोबत जोडलं जाणार Voter ID...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com