KYC Update: बँकेत केवायसी करण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक, RBI ने नागरिकांना सांगितले सावधगिरीचे उपाय

KYC Update: आजकाल बँकेत केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. प्रत्येक ग्राहकाला केवायसी करणे गरजेचे आहे. परंतु केवायसी करताना अनेकदा फसवणुक होते. फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्नाहकांना वारंवार सावधगिरीचा इशारा दिला आहे.
KYC Bank Update
KYC Bank UpdateSaam Tv
Published On

RBI Guideline For Update KYC:

आजकाल बँकेत केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. प्रत्येक ग्राहकाला केवायसी करणे गरजेचे आहे. परंतु केवायसी करताना अनेकदा फसवणुक होते. फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना वारंवार सावधगिरीचा इशारा दिला आहे.

अलीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना फसवणुक होण्यापासून वाचण्यासाठी इशारा दिला आहे. आरबीआयने याहाहत काही मार्ग सांगितले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची फसवणूक टाळू शकता. (latest News)

ग्राहकांना अनेक फेक कॉल, मेसेज, ईमेल प्राप्त होतात. ज्याद्वारे त्यांना वेबसाइटवर लॉगिन करण्यास सांगतात. त्यावरुन त्यांचा पर्सनल डेटा चोरी केला जातो. त्यामुळे कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नये.

ग्राहकांना वेगवेगळ्या मेसेजद्वारे पाठवलेल्या लिंकद्वारे अनधिकृत अॅप्स इन्स्टॉल करण्यास सांगतात. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये वायरस होऊ शकतो.

अनेकदा फ्रॉड व्यक्ती ग्राहकांना अशी माहिती देतात की ग्राहकाला काय करावे आणि काय करु नये याबाबत संभ्रम निर्माण होतो. तसेच असे न केल्यास अकाउंट ब्लॉक किंवा फ्रीज करण्याची धमकी दिली जाते.

या फेक कॉल्स आणि मेसेजद्वारे ग्राहकांच्या अकाउंटचा अॅक्सेस फ्रॉडर्संना मिळतो

KYC Bank Update
PM Kisan Sanman Nidhi Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १६वा हफ्ता कधी येणार आणि कुणाला मिळणार नाही?

काय करावे आणि काय करु नये?

  • तुम्हाला जर केवायसी अपडेटचा मेसेज आला तर मेसेजची खात्री करण्यासाठी बँकेशी संपर्क करा.

  • बँकेशी संपर्क साधण्यासाठी कस्टमर केअर नंबर बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरुन घ्यावा.

  • आपले अकाउंट लॉगिन करताना कार्डचा माहिती, पिन, पासवर्ड किंवा ओटीपी कोणासोबतही शेअर करु नये.

  • ग्राहकांनी कोणत्याही अनधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर आपली माहिती शेअर करु नये,

  • तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील किंवा ई मेलमधील संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका.

अशा प्रकारे करा तक्रार

जर तुमच्यासोबत सायबर फसवणूक झाली असेल तर, नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (www.cybercrime.gov.in) किंवा सायबर हेल्पलाइन (1930) द्वारे तक्रार दाखल करु शकता.

KYC Bank Update
Paytm News : पेटीएमच्या शेअरला सलग तिसऱ्या दिवशी 'लोअर सर्किट'; गुंतवणूकदारांचे २०,००० कोटी बुडाले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com