Paytm News : पेटीएमच्या शेअरला सलग तिसऱ्या दिवशी 'लोअर सर्किट'; गुंतवणूकदारांचे २०,००० कोटी बुडाले

0ne97 COmmunication Share Price : तीन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर पेटीएमचे मार्केट कॅप जवळपास 27,838 कोटी रुपयांवर घसरले आहे. सध्या पेटीएमचा शेअर 438.50 रुपयांवर आला आहे.
paytm
paytm Saam tV
Published On

Paytm Share :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये (One97 Communication) सातत्याने घसरण सुरु आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर पेटीएमचा शेअर लोअर सर्किटला लागला. सध्या पेटीएमचा शेअर 438.50 रुपयांवर आला आहे.

पेटीएमच्या शेअरची किंमत (Paytm Share Price) तीन दिवसांपूर्वी 764 रुपये होती. मागील गेल्या दोन सत्रांमध्ये पेटीएमचे शेअर तब्बल 40 टक्क्यांनी घसरले होते. मागील तीन सत्रांचा विचार केला तर शेअर 42.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

paytm
Paytm News : पेटीएमचं नेमकं काय चुकलं?; रिझर्व्ह बँकेने का केली कठोर कारवाई? वाचा सविस्तर

तीन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर पेटीएमचे मार्केट कॅप जवळपास 27,838 कोटी रुपयांवर घसरले आहे. तीन दिवसांतच पेटीएमच्या गुंतवणूकदारांचे जवळापास 20500 कोटी रुपये बुडाले आहेत. (Latest Marathi News)

इतकेच नाही तर या घसरणीनंतर बीएसई आणि एनएसईने कंपनीच्या शेअर्ससाठी लोअर सर्किट लिमिट 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणले आहे. शेअर आपल्या 2150 च्या IPO किमतीच्या जवळपास 80 टक्के खाली आला आहे.

पेटीएमवर कारवाई का?

पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या 1000 हून अधिक ग्राहकांची खाती एकाच पॅनशी जोडली गेली होती. आरबीआयला अनियमिततेचा संशय आला, ज्याबद्दल बँकेला आधीच नोटीस देण्यात आली होती. यानंतरही पेटीएमने आपली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर सर्वात मोठी चूक केवायसीबाबत झाली. आरबीआयला त्यातही त्रुटी आढळल्या.

कंपनीने आपल्या अनेक ग्राहकांचे केवायसी केले नाही. हजारो ग्राहकांकडे एकच पॅन क्रमांक असल्याचे आढळून आले. RBI आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. कंपनीत काहीतरी नियमबाह्य काम सुरू असल्याचा संशय रिझर्व्ह बँकेला आल्यानंतर पेटीएमवर कारवाई करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com