Paytm News : पेटीएमचं नेमकं काय चुकलं?; रिझर्व्ह बँकेने का केली कठोर कारवाई? वाचा सविस्तर

Paytm Banking Service : आरबीआयला अनियमिततेचा संशय आला, ज्याबद्दल बँकेला आधीच नोटीस देण्यात आली होती. यानंतरही पेटीएमने आपली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
Paytm Service
Paytm ServiceSaam Digital
Published On

Paytm News :

पेटीएमच्या सर्व्हिसेसमध्ये अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने कठोर कारवाई केली आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर, पेटीएम पेमेंट्स बँक आणि तिच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या 1000 हून अधिक ग्राहकांची खाती एकाच पॅनशी जोडली गेली होती.

आरबीआयला अनियमिततेचा संशय आला, ज्याबद्दल बँकेला आधीच नोटीस देण्यात आली होती. यानंतरही पेटीएमने आपली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर सर्वात मोठी चूक केवायसीबाबत झाली. आरबीआयला त्यातही त्रुटी आढळल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Paytm Service
Paytm च्या पेमेंट बँकेचा परवाना होणार रद्द? RBI ॲक्शन मोडमध्ये, ग्राहकांवरही होणार परिणाम

पेटीएमचे हजारो ग्राहक आहेत, ज्यांनी केवायसी कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच कंपनीने आपल्या अनेक ग्राहकांचे केवायसी केले नाही. हजारो ग्राहकांकडे एकच पॅन क्रमांक असल्याचे आढळून आले. RBI आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. कंपनीत काहीतरी नियमबाह्य काम सुरू असल्याचा संशय रिझर्व्ह बँकेला आल्यानंतर पेटीएमवर कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

पेटीएम पेमेंट्स बँकेकडे सुमारे 35 कोटी ई-वॉलेट आहेत. त्यापैकी सुमारे 31 कोटी अॅक्टिव्ह नाहीत, तर केवळ 4 कोटी खाती विना अमाऊंट किंवा फारच कमी रकमेसह चालू आहेत. म्हणजे पेटीएमची मोठ्या प्रमाणात खाती इनअॅक्टिव्ह आहेत. तर लाखो खात्यांमध्ये केवायसी अपडेट केलेले नाही.

Paytm Service
Paytm Share : पेटीएमचे शेअर गडगडले; दोन दिवसांत ४० टक्क्यांची घसरण, गुंतवणूकदारांचे १७ हजार कोटी बुडाले

पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

आरबीआयला काही खात्यांमधून मनी लाँड्रिंगचा संशय होता. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनीचे शेअर्स अवघ्या दोन दिवसांत 36 टक्के घसरले. शुक्रवारी बीएसईवर शेअर 20 टक्क्यांनी घसरून 487.05 रुपयांवर आला. दोन दिवसांत कंपनीचे मार्केट कॅप 17,378 कोटी रुपयांनी घसरून 30,931 कोटी रुपयांवर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com