Facebook मध्ये होणार मोठा बदल! App उघडताच दिसणार रिल्स व्हिडिओ

Facebook New Feature : फेसबुकमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मेटाकडून भारतातील काही निवडक युझर्ससाठी रिल्स-फर्स्ट अनुभवाची चाचणी सुरू आहे. आता अॅप उघडताच फुल-स्क्रीन रिल्स दिसू शकतात.
Facebook Reels-first feature being tested for selected users in India
Facebook Reels-first feature being tested for selected users in India
Published On: 
Summary
  • फेसबुकमध्ये ‘रिल्स-फर्स्ट’ अनुभव आणण्याची चाचणी सुरू

  • भारतामधील काही निवडक युझर्सना अ‍ॅप उघडताच थेट फुल-स्क्रीन रिल्स दिसतील.

  • इतर फोटो, ग्रुप अपडेट्स आणि फीड कंटेंट बंद होणार नसून ते युझर्सना उपलब्ध राहणार आहेत.

फेसबूकमध्ये एक नवी क्रांती घडणार आहे,ज्यामुळे युझर्सला अ‍ॅप वापरण्याचा नवा अनुभव मिळणार आहे. फेसबूक आता असं फिचर्स आणणार आहे, ज्यामुळे युझर्सला थेट रिल्स पाहायला मिळतील. आधी फेसबूक ओपन केलं तर इतर फोटो, ग्रुप अपडेट आणि इतर फीड दिसत असायचं. परंतु फेसबूकच्या या नव्या फिचर्समुळे युझर्स डायरेक्ट व्हिडिओ रिल्स पाहू शकणार आहेत.

मेटानं आता फेसबूकला व्हिडिओ फर्स्ट बनवण्याच्या तयारीत असून भारतात याची चाचणी केली जातेय. यात काही निवडक युझर्सला अ‍ॅप उघडताच इतर फीड ऐवजी थेट पूर्ण स्क्रीन रिल्स पाहायला मिळतील. पण आता अनेकांना वाटत असेल की, फेसबूकमध्ये आता इतर फीड पाहायला मिळणार नाही. पण तसं नाहीये, फेसबूक इतर फीडही दाखवेल.परंतु युझर्सला आधी थेट रिल्स पाहायला मिळणार आहे. दरम्यान फेसबूकचं नवं फिचर युझर्सच्या पसंतीस पडतेय का नाही हे मेटा जाणून घेणार आहे.

Facebook Reels-first feature being tested for selected users in India
Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

फेसबूक उघडताच सुरू होतील रिल्स

मेटाच्या या नव्या चाचणीमध्ये युझर्सला अ‍ॅप उघडताच आधी थेट रिल्स व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामळे त्यांना न्यूज फीड आधी दिसणार नाहीत. यात युझर्स त्याचप्रमाणे व्हिडिओ रिल्स स्क्रोल करू शकतील, जसे ते इंस्टाग्राम किंवा इतर दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओ फ्लॅटफॉर्मवर स्क्रोल करतात.

फेसबूकनं हा बदल करण्याचा विचार का केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मेटानं म्हटलं की, फेसबूकवर युझर्स हे फक्त पोस्ट पाहण्यासाठी येत नाही तर व्हिडिओ आणि रिल्सही पाहतात. युझर्स मोठ्या प्रमाणात रिल्स पाहतात.

Facebook Reels-first feature being tested for selected users in India
Facebook - Instagram Feature : फेसबुक-इन्स्टाग्राम यूजर्ससाठी महत्वाची अपडेट, खास फीचर होणार बंद

भारतात चाचणी सुरू

मेटासाठी सर्वात मोठी बाजारपेठ कोणता देश असेल तो म्हणजे भारत. फेसबूक आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ कंटेन्ट खूप पाहिला जातो.त्याला खूप व्ह्यूज असतात. मेटानं जून २०२४ मध्ये केलेल्या आपल्या एका अभ्यासात म्हटलं होतं की, करण्यात आलेल्या सर्व्हेत ९७ टक्के युझर्स दररोज व्हिडिओ पाहतात. रिल्सही खूप लोकप्रिय आहेत.मेटानुसार त्यांच्या अभ्यासात ८९ टक्के जेन-झी युझर्स म्हणाले होते की, ते दररोज रिल्स वापरत असल्याचं म्हटलं होतं.

सर्व फेसबूक युझर्सला व्हिडिओ दिसणार

मेटानं हा बदल सर्व युझर्ससाठी केला नाहीये. भारतातील काही निवडक युझर्ससाठी ही चाचणी केली जातेय. युझर्स या फिचर्सला किती प्रमाणात पसंत करतात,त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे कंपनी आधी पाहणार आहे. युझर्स किती वेळ व्हिडिओ पाहतात, याचीही नोंद कंपनीकडून केली जाणार आहे.जर हे फिचर्स लोकांना आवडलं तर हे फिचर सर्व युझर्सच्या अ‍ॅपमध्ये इंस्टॉल करेल, असं मेटाकडून सांगण्यात येत आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com