LPG Cylinder Price : सर्वसामान्यांना महागाईचा झटका ! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पाहा नवीन दर

LPG Cylinder New Rate In Mumbai : दर वाढीमुळे सर्वसामान्यांची पुन्हा तारेवरची कसरत सुरु होणार आहे.
LPG Gas Cylinder Price Today
LPG Gas Cylinder Price TodaySaam Tv
Published On: 

LPG Cylindercha Bhav : महिन्याच्या पहिल्या दिवशी गृहिणींना महागाईपासून थोड्याफार प्रमाणात सुटका मिळाली होती. १ जुलै रोजी एलपीजीचे नवीन दर जाहीर करण्यात आले होते. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किंमती बदलत राहातात.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, घरगुती सिलिंडर व व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र यावेळी तेल कंपन्यांनी ४ जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

LPG Gas Cylinder Price Today
LPG Cylinder Price : एलपीजीचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार का कात्री? तपासा तुमच्या शहरातील दर

यावेळी इंडियन ऑइल (Oil) कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी (Oil) वाढ केली आहे. एएनआयने दिलेल्या माहीतीनुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर १,७७३ रुपयांऐवजी १,७८० रुपये मोजावे लागणार आहे.

मात्र, अद्यापह इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर (Website) नवीन दर जाहीर केले गेले नाहीत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहीती एजन्सीकडून सांगण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून सातत्याने कपात केली जात होती. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मे मध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. आता चार महिन्यांनंतर सिलिंडरची किंमत सात रुपयांनी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.