आनंदाची बातमी! LPG सिलेंडर झालं स्वस्त; कुठे आणि किती रुपयांना मिळतंय गॅस सिलेंडर?

LPG Cylinder Prices: LPG सिलेंडरच्या अधिकृत शहरनिहाय दरात २२ सप्टेंबरला मोठा बदल नाही. मात्र काही ग्रामीण भागातील एजन्सींमध्ये कमर्शियल सिलेंडर ₹२०० ते ₹६०० कमी दरात मिळत असल्याचे वृत्त आहे.
LPG cylinder 200 to 600 rupees cheaper in rural areas
LPG cylinder 200 to 600 rupees cheaper in rural areassaam tv
Published On
Summary
  • ग्रामीण भागात कमर्शियल LPG सिलेंडर २०० ते ६०० रुपये स्वस्त

  • २२ सप्टेंबर २०२६ रोजी LPG सिलेंडरचे ताजे दर

  • कमर्शियल गॅस सिलेंडर स्वस्त कुठे मिळतोय

एप्रिल आणि मे महिन्यांच्या कडक उन्हात गॅस एजन्सीबाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे, तो एलपीजी (LPG) सिलिंडर आज सहज उपलब्ध होतो. इराणमधील संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात व्यावसायिक सिलेंडर मिळणे अत्यंत दुर्मिळ झाले होतं. सरकारने या युद्धाच्या काळात सिलेंडरता पुरवठा कमी केला होता. त्यामुळेच सिलेंडरचे दर देखील वधारले होते. ग्रामीण भागात सिलेंडर देखील मिळत नव्हते. आता मात्र ग्रामीण भागात सिलेंडरच्या दरात मोठी घसरण झालीय.

सिलेंडरच्या दर २०० ते ६०० रुपयांच्या कमी दरात उपलब्ध आहे. आज २२ सप्टेंबर रोजी दिल्लीपासून पाटण्यापर्यंत आणि मुंबई ते यवतमाळमधील सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत अजूनही ९४२ रुपये आहे आणि १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २,७४७.५० रुपये इतकीच कायम आहे. मग अनेकांना प्रश्न पडला असेल की सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. हे वाचून अनेकांच्या भुवया उंचवल्या असतील. पण किंमती कमी झाल्या आहेत.

LPG cylinder 200 to 600 rupees cheaper in rural areas
IPS Transfer: १८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस दलात मोठा फेरबदल

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भाग किंवा लहान शहरांमधील गॅस एजन्सींसाठी १९ किलोचे व्यावसायिक सिलेंडर आता 'डेड स्टॉक' (खप न होणारा माल) बनले आहेत. सध्या कुशीनगरमध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २,९४६ रुपये आहे, तर १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत १,०१४ रुपये आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीबाबत वाटाघाटीला वाव नसला, तरी व्यावसायिक सिलिंडर मात्र २,४०० ते २,७०० रुपयांच्या दरम्यान मिळू शकतात.

एजन्सी चालक निश्चित दरापेक्षा कमी किमतीत विक्री का करतात?

नाव न सांगण्याच्या अटीवर एका एजन्सी चालकाने स्पष्ट केले की, गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनात साधारणपणे पाच व्यावसायिक (कमर्शियल) सिलेंडर असतात. वितरीत केलेल्या भरलेल्या सिलेंडरच्या बदल्यात तितक्याच संख्येने रिकामे सिलेंडर घेऊनच हे वाहन परत येते. जर १९ किलो वजनाचे पाच रिकामे सिलेंडर परत दिले नाहीत, तर ट्रक परत येणार नाही आणि पुरवठा खंडित होईल.

ग्रामीण भागात १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडर्सचा वापर खूपच कमी असल्याने, छोटे दुकानदार अनेकदा घरगुती वापराचे सिलिंडर्स कसेबसे मिळवून आपला व्यवसाय चालवतात. परिणामी, पुरवठा साखळी अखंडित राहावी यासाठी त्यांना १९ किलोचे सिलेंडर २०० ते ६०० रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com