LIC ची जबरदस्त योजना! दिवसाला १५० रुपये गुंतवा आणि १९ लाख मिळवा

LIC Childrens Money Back Policy: एलआयसीच्या चिल्ड्रन्स मनी बॅक पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत. तुम्हाला दिवसाला १५० रुपये गुंतवायचे आहे. या योजनेत तुम्हाला १९ लाख रुपये मिळणार आहेत.
LIC Scheme
LIC SchemeSaam tv
Published On

मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना आपल्या कुटुंबाची काळजी असते. मुलांच्या उच्च शिक्षणाची, लग्नाची काळजी असते. मुलांचे भविष्य उज्जवल व्हावे, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पालक खूप आधीपासूनच पैशांची बचत करत असतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. दरम्यान, एलआयसीच्या एका योजनेत तुम्ही दररोज फक्त १५० रुपये गुंतवून १९ लाखांचा फंड जमा करु शकतात.

एलआयसीच्या न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लानमधील गुंतवणूक ही खूप फायद्याची ठरते. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन लाखो रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्ही ० ते १२ वर्षांच्या मुलांच्या नावे खाते उघडू शकतात.

LIC Scheme
MHADA Scheme : स्वस्त घराची संधी! ३१ ऑगस्टपर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करा, सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या

दररोज १५० गुंतवा अन् १९ लाख मिळवा (Invest 150 Daily And Get 19 Lakh)

तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मावेळी ही योजना सुरु करु शकतात. या योजनेत तुम्हाला दिवसाला फक्त १५० रुपये गुंतवायचे आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही महिन्याला एकूण ४५०० रुपये गुंतवणार आहात. वर्षभरात ही रक्कम ५५,००० रुपये होईल.

जर तुम्ही २५ वर्षांपासाठी गुंतवणूक केली तर तुम्ही जवळपास १४ लाख रुपये जमा करणार आहात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदरदेखील मिळते. त्यामुळे तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी व्याज आणि बोनसदेखील मिळतो. या योजनेत तुम्हाला जवळपास १९ लाख रुपये मिळणार आहे. या पैशातून तुम्ही मुलांचे शिक्षण, लग्न या गोष्टींचा खर्च भागवू शकतात.

या योजनेत मुलांच्या वयानुसार तुम्हाला रिटर्न मिळतो. तुमचा मुलगा १८,२०,२२ किंवा २५ वर्षांचा होता तेव्हा तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेतील काही पैसे परत दिले जातात. सम एश्योर्डमधील २० टक्के रक्कम परत दिली जाते. या योजनेत मुलगा जेव्हा २५ वर्षांचा होतो तेव्हा ४० टक्के रक्कम बोनससोबत दिली जाते.

LIC Scheme
Scheme For Youth: पहिली नोकरी मिळताच सरकार देणार ₹१५०००, तरुणांसाठी १ लाख कोटींची योजना; PM मोदींची घोषणा

या योजनेत कमीत कमी १ लाख रुपये एश्योर्ड असतात.जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. मुलाच्या जन्मानंतर तुम्ही जर लगेच गुंतवणूक केली तर तुमचा मुलगा मोठा होईपर्यंत तुम्हाला लाखो रुपये मिळतात.

LIC Scheme
PM SVANidhi Scheme: गणेशोत्सवात आनंदवार्ता! व्यावसायिकांसाठी पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com