Petrol Diesel Rate (5th March 2024) , Petrol Diesel Price Today 5th March 2024
Petrol Diesel Rate (5th March 2024) , Petrol Diesel Price Today 5th March 2024Saam TV

Petrol Diesel Rate (5th March 2024) : इंधनाच्या किमतीत घसरण, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today 5th March 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल -डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.
Published on

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल -डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 78.51 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.80 वर व्यापार करत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

बिहारमध्ये पेट्रोल ३६ पैशांनी तर डिझेल ३४ पैशांनी महागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ४४ पैशांनी तर डिझेल ४१ पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल १३ पैशांनी स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १८ आणि १६ रुपयांची घसरण झाली आहे.

Petrol Diesel Rate (5th March 2024) , Petrol Diesel Price Today 5th March 2024
Kairichi Chutney Recipe : आंबट-गोड कैरीची चटपटीत चटणी, पाहा रेसिपी

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९०.६२ रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईसारख्या (Mumbai) शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये (Price) तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Rate (5th March 2024) , Petrol Diesel Price Today 5th March 2024
Interesting Name Of Railway Station: बाप, चाचा, नाना, साली...; भारतातील भन्नाट रेल्वे स्टेशन, नाव ऐकून हसू थांबणारच नाही

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.७२ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५६ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरमध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०८.९० रुपयांनी विक्री होतंय तर डिझेल ९५.५९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com