Gold Silver Price (18th August) : सणासुदीत सोन्याच्या भावात वाढ; चांदीचा दरही उंचावला, जाणून घ्या आजचे दर

Today's 18th August Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
Gold Silver Price (18th August)
Gold Silver Price (18th August)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (18th August):

ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली. परंतु, आज तिसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पडझड सुरु असते.

मागच्या दरापेक्षा आज सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकाची पातळी गाठली होती. मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.

Gold Silver Price (18th August)
Gold Silver Price (17th August): गुड न्यूज ! सोन्याचा भाव आपटला, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचा भाव

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार 17 ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,170 रुपये मोजावे लागले. आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,250 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,170 रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव जैसे थे आहे तर २२ कॅरेटमध्ये किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७२५०० रुपये मोजावे लागले आहे. तर आज चांदीसाठी ७३५०० रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहे.

Gold Silver Price (18th August)
Good Habits In Children : मुलांना लहानपणापासूनच या ९ चांगल्या सवयी लावा, लोक म्हणतील वाह!

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याची (Gold) किंमत 59,020 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर 59,020 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,020 रुपये इतका असेल.

Gold Silver Price (18th August)
Hill Station Know Honeymoon Capital: 'हनीमून कॅपिटल' म्हणून या हिल स्टेशनची ओळख, नैसर्गिक दृश्य पाहून प्रेमात पडाल!

4.   हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com