Lado Laxmi Yojana: महिलांना दर महिन्याला मिळतात २१०० रुपये; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Lado Laxmi Yojana: हरियाणा सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २१०० रुपये दिले जातात.
Lado Laxmi Yojana
Lado Laxmi YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रासोबत इतर अनेक राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी खास योजना राबवल्या आहेत. हरियाणा सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २१०० रुपये दिले जातात.

Lado Laxmi Yojana
Pension Scheme: काय आहे ५५ रुपयांची पेन्शन योजना? जाणून घ्या दरमहा ३००० रुपये कोणाला आणि कसे मिळतील?

लाडो लक्ष्मी योजना (Lado Laxmi Yojana)

हरियाणा सरकारने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून महिलांना खूप फायदा होतो. या योजनअंतर्गत सरकार थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा करतात. त्यांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप सरकारने लाडो लक्ष्मी योजनेबाबत घोषणा केली होती.या योजनेसाठी अर्थसंकल्पात ५ हजार कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा केली होती.

योजनेची पात्रता (Eligibility)

हरियाणाच्या रहिवासी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीपीएल कार्ड असणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वार्षिक उत्पन्न १.८० लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

Lado Laxmi Yojana
National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

रजिस्ट्रेशन करण्यासाठी कागदपत्रे (Registration Process)

लाडो लक्ष्मी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये ओळखपत्र, लाभार्थी महिलांच्या नावाने बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. याचसोबत उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. या योजनेत केवायसी करणे गरजेचे आहे.

Lado Laxmi Yojana
PM Poshan Scheme: प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत देणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com