Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेत ५,००० कोटींचा घोटाळा? पुरुषांच्या खात्यातही पैसे; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Supriya Sule statement on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरले आहे. ₹५,००० कोटींच्या वितरणाची चौकशी, खरी आकडेवारी जाहीर करण्याची आणि श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam TV Marathi News
Published On

Ladki Bahin Yojana 5000 crore ineligible beneficiaries claim : माहिती अधिकारातून (RTI) समोर आलेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून महायुती सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. या योजनेतील गैरव्यवस्थापन आणि जनतेच्या पैशांची झालेली उधळपट्टी उघड झाली असून सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वरून केली आहे.

अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली तब्बल ५,००० कोटी रुपयांची रक्कम वसूल न करता ती माफ करण्याची तयारी सुरू आहे. हा करदात्यांच्या कष्टाचा पैसा असून प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका जनतेने का सहन करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला, असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हणाल्यात.

माहिती अधिकारात ८२ लाख लाभार्थी वगळल्याची माहिती मिळते, तर दुसरीकडे संबंधित मंत्री ९२ लाख लाभार्थी वगळल्याचा दावा करतात. एकाच योजनेत हा १० लाखांचा फरक कसा काय, असा प्रश्न विचारत त्यांनी खरी आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली. प्रणाली उपलब्ध असतानाही तब्बल १६ लाख अपात्र व्यक्तींच्या आणि अगदी पुरुषांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत यंत्रणा काय करत होती? या घाईगडबडीमुळे अनेक खऱ्या आणि गरजू वंचित महिला या योजनेच्या लाभापासून दूर राहिल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

‘लाडकी बहीण योजने’बाबत कोणतीही लपवाछपवी न करता स्पष्ट आणि निर्दोष आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्याशिवाय या योजनेवर तातडीने 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध करण्यात यावी. अपात्र खात्यांमध्ये गेलेल्या ₹५,००० कोटींच्या वितरणाची निष्पक्ष चौकशी करून खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, असेही सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com