

Ladki Bahin Yojana Installment Update : नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचं लक्ष आता पुढच्या हप्त्याकडे लागले आहे. सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये खात्यात कधी जमा होणार, तसेच ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, असे प्रश्न महिलांकडून उपस्थित केले जात आहेत. दसऱ्याला पैसे मिळणार की दिवाळीआधी दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये खात्यात जमा केले जातील, याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्यांबाबत अजून स्पष्टता नसल्यामुळे महिलांना पुढच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार आहे.
सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेतल्यावर, त्यासंदर्भातल्या शासन निर्णयानंतर पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होऊ शकतात. पण याबद्दल अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
दुसरीकडे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाल्यावर पात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता चर्चेत आहे. पण दिवाळीच्या काळात ही रक्कम मिळेल, याचीही अद्याप अधिकृत खात्री नाही.
सध्या या योजनेचा लाभ राज्यातल्या १ कोटी ६६ लाख महिलांना मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढच्या हप्त्याबाबत सरकार काय निर्णय घेतं, याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाचे - सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याची तारीख, एकत्र ३००० रुपये मिळणार का आणि पैसे जमा होण्याची प्रोसेस याबद्दल अधिकृत घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे लाभार्थी महिलांनी फक्त चर्चेवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.