Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार? दिवाळीआधी सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana ₹3000 installment update : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. २५ ऑक्टोबरनंतर पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे ३००० रुपये मिळणार का? जाणून घ्या सविस्तर अपडेट.
Ladki Bahin Yojana GR Released
Ladki Bahin Yojana GR Releasedmeta ai
Published On: 

Ladki Bahin Yojana September october installment date : ऑक्टोबर महिना अर्धा संपला आहे, पण अद्याप सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. दसरा-दिवाळी असल्यामुळे खर्च कसा करायचा? असा प्रश्न महिलांसमोर उभा ठाकला आहे. 'लाडकी बहीण योजने'चे पैसे आल्यास घरखर्चाला हातभार लागेल, अशी आस महिलांना आहे. ऑक्टोबरचा दुसरा पंधरवाडा सुरू झाला असला, तरी सरकारकडून हप्त्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही; त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (Ladki Bahin Yojana latest news)

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दसऱ्यानंतर मिळेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. मागील दोन महिन्यांचा विचार केला असता, महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात सन्मान निधीचे १५०० रुपये जमा झाले आहेत. २८ ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला होता, तर २७ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आता दसऱ्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबरनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. will Ladki Bahin beneficiaries get ₹3000 before Diwali

Ladki Bahin Yojana GR Released
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

जर ऑक्टोबर अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला नाही, तर दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे; त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांना ३००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana GR Released
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

राज्यातील १ कोटी ६६ लाख पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. प्रत्येक पात्र लाडक्या बहीणीच्या खात्यावर डीबीटीद्वारे (DBT) दरमहा १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा केला जातो. २०२६ च्या सुरुवातीलाच केलेल्या ई-केवायसीनंतर ८० लाखांपेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com