

Ladki Bahin Yojana October Payment Date : राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता सन्मान निधी म्हणून जमा करण्यात आला आहे. मात्र, दिवाळीच्या काळात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये एकत्र जमा होतील, अशी आशा महिलांना होती. (Ladki Bahin Yojana Latest News)
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सरकारने सरसकट ५,००० रुपयांची मदत दिल्याने महिलांना केवळ एकाच महिन्याचा सन्मान निधी देण्यात आला. त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर आता "ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी खात्यात येणार?" असा सवाल लाभार्थी महिलांमधून विचारला जात आहे. (Maharashtra Ladki Bahin Scheme 2026, Ladki Bahin ₹1500 Payment Update,)
ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे?
नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता २५ नोव्हेंबरनंतर महिलांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. मात्र, २२ नोव्हेंबरपर्यंत सरकारने यासंदर्भात शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला नाही, तर हा हप्ता थेट डिसेंबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.
१५ तारखेपर्यंत मिळण्याचीही चर्चा:
जर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा १० नोव्हेंबरपर्यंत सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजुरीबाबत निर्णय घेतला, तर १५ नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, असाही एक सूर वर्तवला जात आहे. दिवाळीनंतर आता ऑक्टोबरच्या १५०० रुपयांच्या हप्त्याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत.
सध्या राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सरकारचे मुख्य लक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यावर आहे. शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत दिल्यानंतर, आता सरकारकडून इतर कल्याणकारी योजनांच्या निधीचे नियोजन केले जात आहे. सरकारकडून मिळणाऱ्या या विविध आर्थिक सहाय्यामुळे आणि अनुदानांमुळे राज्यातील गरजू नागरिक व महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.