Ladki Bahin Yojana: मे महिना आला तरी मार्च-एप्रिलचा हप्ता येईना; लाडक्या बहि‍णींना ₹३००० कधी मिळणार? वाचा नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana March-April Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हप्त्याची प्रतिक्षा आहे. मे महिना सुरु झाला तरीही महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचे पैसे जमा झाले नाही.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

मे महिना सुरु तरीही मार्च-एप्रिलचा हप्ता आला नाही

लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता मिळालेला नाही. मे महिना सुरु झाला तरीही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिना महिना होऊन गेले तरीही पैसे आले नाही त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. त्यानंतर आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ₹४५०० येणार? वाचा अपडेट

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होतील,अशी शक्यता होती. मात्र, महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे तर आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचसोबत एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची तारीखदेखील उलटून गेली आहे. यानंतर ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. दरम्यान, या गोष्टींमुळे अजूनही महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही. आता लाडक्या बहि‍णींना फक्त मार्च महिन्याचा की मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : किती महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता खटाखट जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

लाडकी बहीण योजनेतून १ कोटी ८० लाख महिला अपात्र?

लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी प्रक्रिया ३० एप्रिल रोजी पूर्ण झाली. या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. सुमारे १ लाख ८० हजार महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कालावधीत केवायसीमध्ये चुका झालेल्या महिलांचा लाभ थांबवण्यात आला होता. ईकेवायसी पूर्ण झाल्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल, असं सांगण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : किती लाडक्या बहि‍णींना ₹१५०० चा हप्ता मिळणार? ईकेवायसीनंतर मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com