Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana March-April Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो. महिन्याअखेरीस महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी

या दिवशी खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता

मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही. एप्रिल महिना संपायला आला तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. या महिन्यातदेखील असाच उशिर झाला आहे. दरम्यान, आता एकीकडे मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana
Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील लाडक्या लेकींना मिळतात १ लाख १ हजार रुपये; तुम्हाला मिळाले का?

लाडक्या बहि‍णींना या दिवशी मिळणार ₹३००० (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment May Come on These Date)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यानंतर या महिन्यातदेखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फक्त एका महिन्याचा की दोन महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, महिन्याअखेरी लाडकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेत महिना संपायला फक्त एक आठवडा उरला आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. दरम्यान, याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

लाडक्या बहि‍णींना हे काम करणे अनिवार्य (Ladki Bahin Yojana eKYC Mandatory)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी फक्त ७ दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या केवायसीत चुका झाल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर हे काम करायचे आहे. अन्यथा तुमचा लाभ बंद केला जाईल. दरम्यान, पैसे कधी येणार याबाबत लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा ईकेवायसीनंतरही बंद होणार लाभ; ३० एप्रिलनंतर मिळणार नाही ₹१५००; नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com