Ladki Bahin Yojana : या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये; 'या' तारखेपूर्वी मिळणार जुलैचा हप्ता, अपडेट समोर

Ladki Bahin Yojana July Instalment Update: लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता १५ ऑगस्टपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana payment update for women in Maharashtra
Ladki Bahin Yojana ₹1,500 Payment Updateसाम टीव्ही मराठी (AI)
Published On

Ladki Bahin Yojana July instalment 2026 date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे.

मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या निधीचे थेट हस्तांतरण (DBT) करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी योजनेचा जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत लाडकीचा हप्ता जमा केला जाईल, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वर्ग केला जातो.

Ladki Bahin Yojana payment update for women in Maharashtra
Maharashtra Rain : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

रक्षाबंधनाला ३००० रुपये मिळण्याचीही चर्चा

जर काही तांत्रिक कारणांमुळे १८ ऑगस्टपर्यंत जुलैचा हप्ता जमा झाला नाही, तर थेट रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये एकत्र खात्यात जमा केले जातील, असा अंदाजही काही विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. सरकारी सूत्रांनुसार, राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जुलै महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाईल.

Ladki Bahin Yojana payment update for women in Maharashtra
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर, या आठवड्यात येणार जुलैचा हफ्ता, महत्वाची अपडेट आली समोर

इ-केवायसीमुळे ८० लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी करण्यात आलेल्या इ-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर राज्यातील तब्बल ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. निकषांची पूर्तता न करू शकल्यामुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे या ८० लाख महिलांना या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत आणि इ-केवायसी पूर्ण झाले आहे, अशाच १ कोटी ६६ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर या आठवड्यात योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com