

जिओबुक 11 च्या किंमतीत तब्बल 4,009 ची कपात
नवीन किंमत आता फक्त 12,490 रुपये
लॅपटॉपमध्ये 4G LTE, 4GB RAM, 64GB स्टोरेज आणि 8 तासांची बॅटरी लाइफ
विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप बजेट-फ्रेंडली
मोबाईलबरोबर आता लॅपटॉप देखील अनेकांसाठी महत्वाचा झाला आहे. या महागाईच्या काळात जिओने ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. जिओकडून ग्राहकांना परवडणाऱ्या लॅपटॉपची विक्री होत आहे. कंपनीने Jiobook 11 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 4G LTE कनेक्टिविटी असणारा लॅपटॉप हा ग्राहकांसाठी १६ हजार ४९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. जिओने लॅपटॉपची किंमत ४००९ रुपयांनी कमी केली आहे. अॅमेझॉनवर हा लॅपटॉप १२,४९० रुपयांमध्ये दिसत आहे. जिओचा लॅपटॉप हा अॅमेझॉन व्यतिरिक्त जिओ मार्ट, जिओ स्टोरवर देखील मिळेल.
990 ग्रॅम वजनाचा सुपर लाइट आणि परवडणारा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपला ११.६ इंच स्क्रिन देण्यात आली आहे. तर लॅपटॉपमध्ये ४ जीबी रॅम, ड्युअल बँड वाय-फाय, सिम कार्डची देखील सोय देण्यात आली आहे. तसेच या लॅपटॉपमध्ये अँटी ग्लेयर एचडी डिस्प्ले आणि चांगल्या साऊंडसोबत डिव्हाइसला स्टीरियो स्पीकर्स दिले आहेत.
अॅमेझॉनवरील लिस्टिंगच्या माहितीनुसार, लॅपटॉप सिंगल चार्जवर ८ तासांची बॅटरी लाइफ मिळते. एका वर्षांची वॉरंटी देखील देण्यात आली आहे. यामध्ये Mediatek MT 8788 ऑक्टा कोर प्रोसेसर दिलं आहे. 4 जीबी LPDDR4 रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवला जाऊ शकतो. जिओचा हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.