Jio 749 RS Plan: जिओचा ९० दिवसांचा धमाकेदार प्लान; युझर्सला मिळेल अतिरिक्त डेटाचा फायदा

Reliance Jio 90 Days Plan: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रकारचे रिचार्ज प्लान आणत असते. स्वस्त आणि महागड्या रिचार्ज प्लॅन्ससोबत, जिओच्या यादीत अनेक दीर्घकालीन योजना देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका प्लानबद्दल सांगणार आहोत जो ९० दिवसांचा आहे.
Jio 749 RS Plan: जिओचा ९० दिवसांचा धमाकेदार प्लान;  युझर्सला मिळेल अतिरिक्त डेटाचा फायदा
Reliance Jio

रिलायन्स जिओ नेहमी आपल्या युझर्सची नड ओळख ऑफर आणत असते. त्यामुळे कंपनीने स्वस्त तसेच महागडे आणि अल्पकालीन तसेच दीर्घकालीन प्लान सादर केले आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणतीही प्लान निवडू शकता. जर तुम्ही Jio सिम वापरत असाल आणि दीर्घ वैधता असलेला प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एका शानदार प्लानबद्दल माहिती देणार आहोत.

जिओकडे वेगवेगळ्या डेटा ऑफरच नाहीत तर वेगवेगळ्या वैधतेच्या प्लानदेखील आहेत. यामध्ये २८ दिवस ३० दिवस ५६ दिवस ८४ दिवस ३६५ दिवसांसाठी अनेक आश्चर्यकारक प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लानची माहिती देणार आहोत ज्याची वैधता ९० दिवस आहे. जिओने काही दिवसांपूर्वी आपल्या पोर्टफोलिओमध्ये क्रिकेट ऑफर अंतर्गत ७४९ रुपयांचा प्लान आणला होता. या प्लानमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना उत्तम ऑफर देत आहे. जर तुम्हाला अधिक डेटा आणि दीर्घ वैधता प्रदान करणारा प्लान हवा असेल तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Jio ७४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ९० दिवसांची दीर्घ वैधता ऑफर करते. यामध्ये यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर ९० दिवसांसाठी मोफत अमर्यादित कॉलिंग सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगसोबतच दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतात. Jio च्या या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या डेटा ऑफरबद्दल म्हणाल तर संपूर्ण वैधतेसाठी १८० GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही दररोज २जीबी डेटा वापरू शकता. केवळ नियमित डेटाच नाही तर कंपनी या प्लानमध्ये मोफत डेटा देखील देते. या प्लानमध्ये तुम्हाला २० जीबी डेटा फ्री मिळेल. अशाप्रकारे कंपनी या पॅकमध्ये युझर्सला एकूण २०० जीबी डेटा ऑफर करते.

रिलायन्स जिओचा हा प्लॅन अमर्यादित 5G डेटा ऑफरसह येतो. तुमच्या परिसरात 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही या प्लानसह अमर्यादित ५ जी डेटा विनामूल्य वापरू शकता. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

Jio 749 RS Plan: जिओचा ९० दिवसांचा धमाकेदार प्लान;  युझर्सला मिळेल अतिरिक्त डेटाचा फायदा
TRAI News : एकाच फोनमध्ये २ सिमकार्ड वापरताय? भरावा लागू शकतो दंड; वाचा TRAI चा प्रस्ताव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com